विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : आधीच कोरोनाचे रेड झोन असलेल्या औरंगाबाद शहरात गेल्या २४ तासांत ४२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील नूर कॉलनी, किले अर्क भागात प्रामुख्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हे दोन्ही भाग सील करण्यात आले आहेत.
आतापर्यंत शहरातील कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची आकडेवारी सिंगल डिजिटमध्ये वाढत होती. पण गेल्या २४ तासांत एकदम ४२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण असेच वेगाने वाढताना आढळत आहे. औरंगाबादमध्ये नूर कॉलनी आणि किले अर्क भागात पोलिसांनी बंदोबस्तही वाढविला आहे.