• Download App
    औरंगाबादेत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या मौलानासह २७ जणांना अटक | The Focus India

    औरंगाबादेत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या मौलानासह २७ जणांना अटक

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : नमाजासाठी जमलेल्यांना पोलिसांनी अडविल्यानंतर पोलिसांवरच दगडफेक करणाऱ्या मौलानासह २७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

    जमावाच्या दगडफेकीत अधिकाऱ्यासह तीन पोलिस जखमी झाले. औरंगाबादमध्ये दिवसागणिक करोनाचा विळाखा वाढतच आहे. येथील करोनाग्रस्तांची संख्या ५० च्या पुढे गेली आहे. शहरात पुर्णपणे लॉकडाउन असून पाच पेक्षा जास्त लोकांना फिरण्यास किंवा एकत्र जमण्यास बंदी आहे. सर्व मंदिर-मस्जिद किंवा इतर धार्मिक कार्यक्रम,सणही साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

    तरीही औरंगाबादमध्ये एका प्रार्थना स्थळावर काही लोक एकत्र आले. त्यांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार याप्रकरणी संबंधित प्रकरणातील २७ हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर या हल्ल्यात एका पोलीस आधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…