तुमच्यावर विश्वास ठेऊन निर्णय घेतला आणि काही गोष्टी बघून मला धक्का बसला अशा शब्दांत उध्दव ठाकरे यांनी आपली चिंता व्यक्त केली. राज्यातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी आपली खंतही व्यक्त केली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुमच्यावर विश्वास ठेऊन निर्णय घेतला आणि काही गोष्टी बघून मला धक्का बसला अशा शब्दांत उध्दव ठाकरे यांनी आपली चिंता व्यक्त केली. राज्यातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी आपली खंतही व्यक्त केली.
ठाकरे म्हणाले, जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून सरकारनं धाडसी निर्णय घेतला आहे. आता जीवनावश्यक वस्तुंची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही गोष्टी बघून मला धक्काच बसला. लोक जिथे अडकले आहेत. त्यांची व्यवस्था केली जात आहे. मात्र, काही जण ट्रक आणि टँकरमधून प्रवास करत आहे. हे संकट घराबाहेर पडल्यानंतर धोकादायक आहे. त्यामुळे घरात राहण महत्त्वाचं आहे. मात्र, घरात राहताना संकट आल्यासारखं राहू नका. हे संकट घरात येणार नाही. त्यामुळे जिथे आहात तिथे राहा. अनधिकृत मागार्चा वापर करून प्रवास करू नका.
संचारबंदी लागू केल्यानंतर संभ्रम निर्माण झाला होता. आता भाजीपाल्याची आवकही सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याचं कारण नाही. गर्दी करू नका, असे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. पोलिसांवर किती ताण टाकायचा याचाही आपण विचार करायला हवा. ह्यखाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नये. रुग्ण आढळल्यास सरकारी रुग्णालयात पाठवा. घाबरून जाऊन दवाखाने बंद ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, आपण करोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आपण पोहोचलो असल्याचं सांगितलं. २४ तासं दुकानं सुरु ठेवणे हा आपल्या सरकारचा धाडसी निर्णय आहे. तुमच्या विश्वासावर हा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही आहे. संकटाच्या मागे हात धुवून लागायचं आहे. जीवनाश्यक वस्तूंची दुकान २४ तास सुरु राहणार आहेत हे वारंवार सांगत आहोत.
राज्यात अनेक कामगार विविध ठिकाणी अडकले आहेत. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, काही राज्यांचे मुख्यमंत्री मला फोन करत आहेत. हे एक संकट आहे. जिथे आहात तिथेच थांबा असे आवाहन मी करत आहे. परराज्यातील कामगारांची जबाबदारीही राज्य सरकार घेत आहेत. काही संस्थांनाही आम्ही आवाहन करत आहोत. त्या संस्था पुढे येऊन जर त्यांची जबाबदारी घेणार असतील तर सरकारला फार मोठी मदत होईल. महाराष्ट्रात जे इतर राज्यातील कामगार आहेत तिथेच थांबावं ही महाराष्ट्र सरकारची सूचना आहे. याशिवाय महाराष्ट्रातील जे इतर कामगार असतील त्यांची माहिती आपल्याकडे आहे. त्यांची व्यवस्था तिथे केली जात आहे. माणुसकी जपली पाहिजे. त्याची सध्या मदत होत आहे.