• Download App
    उद्योग सुरू होतानाच चिंता वाढली; नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले २१ जण कोरोना पॉझिटिव्ह | The Focus India

    उद्योग सुरू होतानाच चिंता वाढली; नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले २१ जण कोरोना पॉझिटिव्ह

    मालेगावसह नाशिक शहर आणि जिल्ह्यात दिवसभरात २१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. उद्यापासून उद्योगधंदे अंशत: सुरू होत आहेत. या दिलासादायक बातमीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येतील वाढ चिंताजनक आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक :  करोनाचा नाशिक जिल्ह्यात वाढता फैलाव सगळ्यांना चिंतेत टाकणारा आहे. आज नाशिक जिल्ह्यात नवीन २१ नवीन रूग्ण आढळून आले असून यात मालेगावात १५ नाशिक शहरात ५ आणि सिन्नरमध्ये एक रूग्णाला करोनाचा संसर्ग झाला आहे. पहिल्यांदाच एकाच दिवशी जिल्ह्यात २१ रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

    काही तासाआधी मालेगाव शहरातील एकूण ५ रुग्ण करोना बाधित आढळले होते. यात आताच प्राप्त अहवालानुसार आणखी १० नवीन रुग्णांची वाढ झाली असून शहरातील रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. यातील ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच २ करोना संशयित रुग्णाचा देखील मृत्यू झाल्याने मालेगाव शहराची चिंता वाढली आहे.

    Related posts

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीच पाडली त्यांच्या पक्षात फुट; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे टार्गेटवर!!

    फडणवीसांनी अशोक खरातच्या मुसक्या आवळेपर्यंत विरोधक झोपले होते, पण आता त्यांच्यातले “पोपट” बोलायला लागले!!

    फडणवीसांनी “डाव” टाकल्यामुळे पवारांना राज्यसभेची खासदारकी, पण पवारांची महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी!!