• Download App
    उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच; जळगाव जिल्ह्यात ११ नवे पॉझिटिव्ह | The Focus India

    उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच; जळगाव जिल्ह्यात ११ नवे पॉझिटिव्ह

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाहीए. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे नवे ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जळगाव, अमळनेर, भुसावळ येथे स्वॅब घेण्यात आलेल्या 70 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 59 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर अकरा व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

    पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये अमळनेर येथील एक 58 वर्षीय महिला, भुसावळ येथील चार ( 32, 50, 52, 64 वर्षीय) पुरूषांचा तर जळगाव शहरातील पवननगर व इतर भागातील सहा (यामध्ये 14 वर्षीय मुलगी, 38, 55, 70 वर्षीय महिलांचा तर 46 व 70 वर्षीय पुरूषांचा) व्यक्तींचा समावेश आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित रूग्णांची संख्या 174 झाली आहे. यापैकी 20 रूग्णाचा मृत्यू झाला आहे तर तीन व्यक्ती करोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

    Related posts

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीच पाडली त्यांच्या पक्षात फुट; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे टार्गेटवर!!

    फडणवीसांनी अशोक खरातच्या मुसक्या आवळेपर्यंत विरोधक झोपले होते, पण आता त्यांच्यातले “पोपट” बोलायला लागले!!

    फडणवीसांनी “डाव” टाकल्यामुळे पवारांना राज्यसभेची खासदारकी, पण पवारांची महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी!!