• Download App
    उत्तर प्रदेशात सर्व क्षेमकुशल; तुम्ही काळजी करा महाराष्ट्राची - योगी आदित्यनाथांनी संजय राऊत यांना सुनावले | The Focus India

    उत्तर प्रदेशात सर्व क्षेमकुशल; तुम्ही काळजी करा महाराष्ट्राची – योगी आदित्यनाथांनी संजय राऊत यांना सुनावले

    पालघरमधील तीन साधूंच्या हत्येच्या प्रकरणातील रक्तही वाळले नसताना उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येवर ट्विट करणार्या खासदार संजय राऊत यांना योगी आदित्यनाथ यांनी चांगलेच सुनावले आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. येथे गुन्हेगारांना शिक्षा होते. तुम्ही महाराष्ट्रातील चिंता करा, असे योगींनी म्हटले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पालघरमधील तीन साधूंच्या हत्येच्या प्रकरणातील रक्तही वाळले नसताना उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येवर ट्विट करणार्या खासदार संजय राऊत यांना योगी आदित्यनाथ यांनी चांगलेच सुनावले आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. येथे गुन्हेगारांना शिक्षा होते. तुम्ही महाराष्ट्राची चिंता करा, असे योगींनी म्हटले आहे.

    उत्तर प्रदेशातील बुलंदशहर भागात दोन साधूंची हत्या झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावरून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका केली आहे.

    उत्तर प्रदेशातील घटना भयंकर असून याला कोणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. पालघरमध्ये असा प्रकार झाला होता, अशा आशायचं ट्विट केलं.

    राऊत यांच्या आरोपाला योगी आदित्यनाथ यांनी कडक शब्दांत उत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. बुलंदशहर घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सांभाळा उत्तर प्रदेशची चिंता करु नका अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.

    पालघर येथे  चोर-दरोडेखोर समजून तीन साधूंची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे पोलीसांच्या समोर हा प्रकार घडला होता. एका पोलीसानेच वाचविण्याची विनवणी करणार्या साधुला जमावाच्या ताब्यात दिले होते.

    बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या १० वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास आहे. दोन्ही साधू मंदिरातील धार्मिक विधी करतात. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री मंदिर परिसरात दोघांची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी गावातील लोक मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणात राजू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी गावापासून दोन किमी अंतरावरून अटक केली.

    Related posts

    Hard Facts : ट्रम्पशी पंगा झाला म्हणून अमेरिकेशी सगळे संबंध संपलेले नाहीत, भारत चीनच्या कह्यात देखील गेलेला नाही!!

    ट्रम्पच्या टेरिफ दादागिरीची मोदींना “वैयक्तिक किंमत” चुकवावी लागेल, पण ती किती आणि कोणती??

    भास्कर जाधवांना मंत्री पदाची घाई, पण महाविकास आघाडीत बिघाडीची शशिकांत शिंदे यांची कबुली, एकाही मंत्र्याची विकेट काढली नाही!!