आरोग्य सेतू वरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी टीका करत असताना त्याची उपयुक्तता समोर आली आहे. सुमारे 1.4 लाख आरोग्यसेतू अँप धारकांना संसर्गित रुग्णांच्या सान्निध्यात आल्यामुळे, संभाव्य संसर्गाचा धोका टळला आहे. ब्लूटूथ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून त्यांना इशारा देण्यात आला.:
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आरोग्य सेतू वरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी टीका करत असताना त्याची उपयुक्तता समोर आली आहे. सुमारे 1.4 लाख आरोग्यसेतू अँप धारकांना संसर्गित रुग्णांच्या सान्निध्यात आल्यामुळे, संभाव्य संसर्गाचा धोका टळला आहे. ब्लूटूथ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून त्यांना इशारा देण्यात आला.
चीनी व्हायरस विरुद्धच्या लढ्यात आरोग्यसेतू अँप अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे, हे सिद्ध झाले आहे. लोक संसर्गजन्य व्यक्तींच्या संपर्कात येण्यापूर्वी त्यांना धोक्याची सूचना देण्यासाठी हे अँप विकसित करण्यात आले आहे,यावरुन स्वतःच्या प्रकृतीचे मूल्यमापन देखील करता येते.
लवकरच आरोग्यसेतू अँपच्या वापरकर्त्यांची संख्या 10 कोटींपर्यंत पोहोचणार आहे; या अँपने 5 कोटी वापरकर्त्यांपर्यत सर्वाधिक जलद गतीने पोहचण्याचा विश्वविक्रम केला आहे. व्यक्तीची गोपनीयता प्रथम- या तत्वावर हे अँप विकसित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
ब्लुटूथ कॉन्टॅक्टस ची आणि स्वयंमूल्यांकनाची आकडेवारी/माहिती मिळते तेव्हा त्यांना फोन केला जातो, त्यांच्या स्थितीची माहिती आणि गरजू रुग्णांना आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठवले जाते. पॉझिटिव्ह रुग्णांची हालचालींविषयक माहिती आणि स्वयंमूल्यांकन डेटा एकत्र केला जातो.ज्यामुळे जे भाग हॉट स्पॉट ठरु शकतात, अशा भागांना ओळखणे सोपे जाते प्रतिबंधात्मक उपाय केले जातात.. अशा 697 स्पॉट्सची माहिती राज्ये/ जिल्ह्यांना देण्यात आली आहे
प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हॉट स्पॉट्स आणि प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करणारे एक ऍप विकसित करण्यात आले आहे. त्या भागात आवश्यक ते मार्गदर्शक नियम लागू करता येतील. -अध्यक्ष, गोपनीयता हे आरोग्यसेतूचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे, नव्या वापरकर्त्याच्या उपकरणासाठी एक विशिष्ट अज्ञात ओळखक्रमांक तयार केला जातो आणि केवळ हाच क्रमांक वापरला जातो, वापरकर्त्यांचे नाव अँप वर वापरले जात नाही ज्यावेळी दोन आरोग्य सेतू अँपधारक एकमेकांच्या संपर्कात येतात, त्यावेळी एका व्यक्तीच्या संपर्काची माहिती दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये सांकेतिक स्वरुपात साठवली जाते.
ज्यावेळी अँपधारक कोविड-19 पॉझिटिव्ह बनतो केवळ त्यावेळीच ही माहिती सर्वरमध्ये साठवली जाते.आरोग्यसेतू अँप वरुन मिळालेली माहिती सरकार केवळ आरोग्यविषयक हस्तक्षेपासाठी वापरते, इतर कोणत्याही कामासाठी नाही. आरोग्यसेतू अँप धारकाची वैयक्तिक ओळख कोणाकडेही उघड केली जात नाही. कोविड-19 पासून ऍप धारकाचे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठीच केवळ या ऍपचा वापर करण्यात येत आहे. आरोग्यसेतू वर केवळ 30 दिवसांचा डेटा संचयित केला जातो.
पॉझिटिव्ह रुग्णांचा डेटाही ते बरे झाल्यानंतर 60 दिवसांनी सर्व्हर वरुन डिलीट केला जातो. वापरकर्त्यांचा लोकेशन डेटा प्रतिबंधनाच्या कार्यवाहीसाठी वापरला जातो.
लहान भागातील लोकांना कोविड-19 सावधानच्या माध्यमातून सावधगिरीचा इशारा देण्यात येतो. क्वारंटाईन एलर्ट सिस्टम विलगीकरणावरील देखरेखीत मदत करते मायग्रेशन सिस्टमची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या लोकांना मदत होते,असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे