• Download App
    आफ्रिदीला सपोर्ट करणाऱ्या भज्जी, युवीला नेटकऱ्यांनी धुतले...!! | The Focus India

    आफ्रिदीला सपोर्ट करणाऱ्या भज्जी, युवीला नेटकऱ्यांनी धुतले…!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी पाकिस्तानातील कोरोनाग्रस्तांना मदत करत आहे. त्याचे काम मानवतेचे आहे. त्याला सपोर्ट करा. मदत करा, असे सोशल मीडियावरून आवाहन करणाऱ्या हरभजनसिंग आणि युवराज सिंगला नेटकऱ्यांनी चांगलेच धुतले. आफ्रिदी त्याच्या देशातल्या पीडितांना मदत करतोय. पण तुम्ही भारतीयांना मदत करायची सोडून त्याच्या पाठिशी का उभे राहताय? शेम ऑन यू, अशा शब्दात एका नेटकऱ्याने प्रतिक्रियात व्यक्त केली. आफ्रिदी आता मानवतेचे काम पाकिस्तान्यांसाठी करतोय, एरवी तो भारतीय सैन्याबद्दल गरळ ओकत असतो. काश्मीरबद्दल वाटेल ते बरळत असतो, ते तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल दुसऱ्या नेटकऱ्याने भज्जी, युवीला केला आहे. मानवता फक्त पाकिस्तान्यांसाठी आहे, भारतीयांसाठी नाही काय, अशी टिपण्णी आणखी एका नेटकऱ्याने केली आहे. एखाद दुसऱ्या नेटकऱ्याने युवी, भज्जीला पाठिंबाही दिला आहे. काहींनी # wesupportyvui देखील चालवले आहे, पण बहुसंख्य नेटकऱ्यांनी मात्र या दोन्ही क्रिकेटपटूंना चांगलेच खडसावले आहे.

    Related posts

    बरोबरच आहे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीस कशाला लिहून देतील??, पण…

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!