विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात ३० लाख मजूर, कामगारांना श्रमिक एक्सप्रेसने घरी पोहोचवले, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली.
लॉकडाउनच्या बंद ठेवलेली रेल्वे सेवा हळहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. पीयूष गोयल यांनी मंगळवारी २०० विशेष नॉन एसी रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर त्या गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षणही सुरू करण्यात आले आहे.
आता त्या पाठोपाठ आता कॉमन सर्व्हिस सेंटरवरही तिकीट विक्री सुरू करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे. तसेच आतापर्यंत ३० लाख मजुरांना श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले असल्याची माहिती त्यांनी दिली.
कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकिट विक्रीसह आता काही ठराविक रेल्वे स्थानकांवरदेखील जाऊन रेल्वेच्या तिकिटांचं आरक्षण करता येणार आहे. सध्या देशातील १.७ लाख कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकिट विक्री सुरू करण्यात येणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये प्रवाशांना ठराविक रेल्वे स्थानकांवरील तिकिट विक्री सुरू केली जाणार असून त्यासंदर्भात प्रोटोकॉल तयार केला जात असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. म्हणाले.