सुदृढ लोकशाहीमध्ये जबाबदार विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार असतो. शासनावर अंकुश ठेवण्याचे काम करताना संसदीय आयुधे वापरताना आंदोलन महत्वाचे असते. परंतु, सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या आघाडीच्या एकत्रित ट्रोल आर्मीने लोकशाहीच्या संकेतांनाच धुडकावून लावले आहे. आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर वैयक्तिक आरोप करून त्यांचे चारित्र्यहनन करणाऱ्या या ट्रोल आर्मीने भाजपाने उपस्थित केलेल्या मुळ प्रश्नांना उत्तर देण्याचे मात्र टाळले आहे.
निलेश वाबळे
सुदृढ लोकशाहीमध्ये जबाबदार विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार असतो. शासनावर अंकुश ठेवण्याचे काम करताना संसदीय आयुधे वापरताना आंदोलन महत्वाचे असते. परंतु, सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या आघाडीच्या एकत्रित ट्रोल आर्मीने लोकशाहीच्या संकेतांनाच धुडकावून लावले आहे. आंदोलन करणाºया भाजपाच्या नेत्यांवर वैयक्तिक आरोप करून त्यांचे चारित्र्यहनन करणाऱ्या या ट्रोल आर्मीने भाजपाने उपस्थित केलेल्या मुळ प्रश्नांना उत्तर देण्याचे मात्र टाळले आहे.
संपूर्ण देशात आज महाराष्ट्रातील चीनी विषाणूच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. चीनी विषाणूचे देशातील सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई चीनी व्हायरसच्या कराल दाढेत सापडली आहे. संपूर्ण देशातील अर्थव्यवस्था मुंबईवर अवलंबून असते. परंतु, मुंबईला वाचविण्यासाठी आघाडी सरकार संपूर्ण शक्ती पणाला लावत आहे, असे चित्र दिसत नाही.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यावर रुग्णांची संख्या विक्रमी आकडे गाठत आहे. यामध्ये निश्चितच काहीतरी चुकते आहे. राष्ट्रीय माध्यमेही हा प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजपाने यावर प्रश्न केला तर आघाडीतील तीनही पक्षांच्या नाकारला मिरच्या झोंबण्याचे कारण नव्हते.
राज्यातील महाविकास आघाडीच्या निष्क्रीयतेमुळे सामान्य माणूस हतबल झाला आहे. अशा स्थितीत राज्य सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू करण्यात आले. त्याला जनतेकडून प्रतिसादही मिळाला, याचा अर्थ अस्वस्थता आहे. याचे कारण म्हणजे राज्यातील महाविकास आघाडी सरकार चीनी व्हायरस रोखण्यासाठी प्रभावी काम करत नाही.
राज्यातील विशेषत: मुंबईतील संकट वाढतच चालले आहे. राज्यातील रोजंदारी कामगार, बारा बलुतेदार, शेतकरी यांच्यासाठी हे सरकार पॅकेजही घोषित करत नाही. यामुळे कोरोनाच्या संकटात राज्य सरकारवर टीका करायची नाही, हे धोरण बदलून सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले.
आता हे आंदोलन करणाऱ्या भाजपाला थेट महाराष्ट्रद्रोही ठरविण्याचे कारण नव्हते. परंतु, मुळ प्रश्नांचे उत्तर नसल्याने आघाडीतील तीनही पक्षांकडे त्याशिवाय पर्याय नव्हता. सध्या राज्याचे नेतृत्व शिवसेनेकडे असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पालकत्वाची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे भाजपाच्या विरोधातील आंदोलनात सर्वाधिक सक्रीय राष्ट्रवादीच होती.
मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही भाजपावर टीका करताना सभ्यतेचे सारे संकेत पायदळी तुडविले. भारतीय जनता पक्षातील अंतर्गत बाबींवर भाष्य करण्यात आले. नेत्यांच्या फोटोंचे मॉर्फींग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. मी कोरोना योध्दा, मी सरकारसोबत असे म्हटले गेले. महाराष्ट्रद्रोही भाजपा हा ट्रेंड चालविण्यासाठी भाडोत्री ट्रोल आर्मी कामाला लावण्यात आली.
दुसऱ्या बाजुने शिवसेनेही महाराष्ट्र बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. परंतु, शिवसेनेने नेहमीची ठोकशाहीची भाषाच यामध्ये पाहावयास मिळाली. शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत भाजपानं राज्य सरकारचे आणि महाराष्ट्राचे हात बळकट करण्याची गरज आहे. आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला हलवल्यानंतर भाजपानं काळ्या पट्ट्या, काळ्या हाफ चड्ड्या घालून आंदोलन केले असतं तर जनतेनं त्यांची पाठ थोपटली असती.
मुळात आताच्या संकटाच्या काळात भाजपाने जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यावर बोलणे अपेक्षित होते. पण पुन्हा एकदा मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला नेण्याचा मुद्दा असो की केंद्राकडून मिळणारी मदत या जुन्याच मुद्यांना सांगून मुळ प्रश्न टाळता येणार नाहीत. पण ट्रोलआर्मीच्या सहाय्यानेच विरोधकांना उत्तर द्यायचे आणि स्वत:च्या कारभारात सुधारणा करायच्या नाहीत ही शिवसेनेची आत्तापर्यंतची कार्यपध्दती राहिली आहे. त्याला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देत आहेत. सामान्य परिस्थितीत हे ठिक आहे, पण आता चीनी व्हायरससारख्या संकटात वैयक्ति हेवेदावेच राजकारणाचा पाया बनणार असतील तर उध्दवा अजब तुझे सरकार असेच म्हणावे लागेल.