पंतप्रधान नरेंद्र मोदी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मान देत असताना आंध्र प्रदेशात मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एन ९५ मास्कची मागणी करणाऱ्या एका डॉक्टरला चक्क वेडा ठरवून मेंटल हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले.
वृत्तसंस्था
विशाखापट्टणम : पंतप्रधान नरेंद्र मोदी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा म्हणून त्यांना सन्मान देत असताना आंध्र प्रदेशात मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एन ९५ मास्कची मागणी करणाºया एका डॉक्टरला चक्क वेडा ठरवून मेंटल हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले.
विशाखापट्टनम येथील एका डॉक्टरने एन ९५ मास्कची मागणी केली होती. त्यावरून वाद झाला. यावरून डॉक्टर चिडल्यावर पोलीसांना बोलावण्यात आले. पोलीसांनी त्यांच्यासोबत दांडगाई केली. यावरून भांडणे झाल्यावर पोलीसांनी डॉक्टरांवर कलम ३५३ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल केला. धक्कादायक म्हणजे त्यांना मेंटल हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले.
या ठिकाणी प्राथमिक तपासणी केल्यावर त्यांना गंभीररित्या मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाच्या प्रमुखांनी त्यांना मेंटल हॉस्पीटलमध्ये भरती करण्याचे आदेश दिले. या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे