विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये वृद्ध नागरिकांचा प्रवास कमी करण्यासाठी आणि भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या प्रवासासाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या विशेष सवलती काढून घेतल्या आहेत. अनावश्यक प्रवास करण्यापासून परावृत्त करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे.
निर्णय :
• कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानास २२ मार्च २०२० नंतर एका आठवड्यासाठी भारतात उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
• लोकप्रतिनिधी / सरकारी कर्मचारी/ वैद्यकीय व्यावसायिक वगळता ६५ वर्षांवरील सर्व नागरिक (वैद्यकीय सहाय्य व्यतिरिक्त) यांना घरीच राहण्याचा निर्देश राज्य सरकारे देतील
आता खरं पुणे थांबलं…तुळशीबागेत चक्क शुकशुकाट!
• त्याचप्रमाणे, १० वर्षांखालील सर्व मुलांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात येईल आणि बाहेर पडण्याचे धाडस करू नये.
• विद्यार्थी, रूग्ण आणि दिव्यांग प्रवर्ग वगळता रेल्वे आणि नागरी विमान वाहतूक सर्व सवलतीच्या प्रवासाला स्थगिती देईल.
• आपत्कालीन / आवश्यक सेवांमध्ये काम करणार्यांना सोडून खाजगी क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी ’घरातून काम‘ योजना लागू करण्याची विनंती राज्यांना केली जात आहे.
• गर्दी कमी करण्यासाठी ब आणि क श्रेणी केंद्र सरकारी कर्मचार्यांना आठवड्याआड कार्यालयात जाण्यास सांगितले जाईल .