विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेत चीनी व्हायरसचा उद्योगक्षेत्रालाही जबरदस्त तडाखा बसला असून बेरोजगारी गगनाला भिडली आहे. एका मार्च महिन्यातच तब्बल १ कोटी तरुणांनी रोजगार गमावल्याने बेरोजगारी भत्यासाठी अर्ज केला आहे. २८ मार्चला संपलेल्या एकाच आठवड्यात तब्बल ६६ लाख तरुणांचा असे अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. चीनी व्हायरसच्या अमेरिकन अर्थ व्यवस्थेला बसलेल्या तडाख्याची २००८ मधील आर्थिक महामंदीशी तुलना करण्यात येत आहे.
गेल्या ५ वर्षांमध्ये अमेरिकन तरुणांनी मिळविलेल्या नोकऱ्या, रोजगार चीनी व्हायरसच्या दोन आठवड्यांच्या प्रकोपाने गिळंकृत केल्या. यात रेस्टॉरंट, हॉटेल, ट्रँव्हल कंपन्या यातील छोटे रोजगार तर गेलेच आहेत पण उत्पादन क्षेत्रातील मंदीच्या गर्तेत मोठ्या कंपन्या अडकल्याने ले ऑफमुळे नोकऱ्याही गेल्या आहेत. सुमारे १ कोटी तरुणांनी बेरोजगारी भत्यासाठी अर्ज केले आहेत पण बेरोजगारांचा आकडा त्यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. फेब्रुवारी २०१० मध्ये बेरोजगारी दर ३.७% होता. तो आता १०% ला भिडला आहे. बेरोजगारी भत्यासाठी आणि त्यांना अन्य सवलती देण्यासाठी अमेरिकन काँग्रेसने २.२ ट्रिलियन डॉलरच्या मदतीचे विधेयक मंजूर केले आहे.
२००८ च्या महामंदीपेक्षा यंदाचे बेरोजगारीचे प्रमाण भयानक आहे, असे मिनिसोटा विद्यापीठातील अर्थशास्री अँरॉन सोर्जरन यांनी सांगितले, तर जुलै २०२० मध्ये २ कोटी तरुणांना रोजगार आणि नोकऱ्या गमवाव्या लागलीत, असे अर्थशास्त्री हिदी शेरहोल्झ यांनी स्पष्ट केले. २.२ ट्रिलियन डॉलरच्या मदतीचा स्वयंरोजगाराला मुकलेल्या तरुणांना फायदा मिळणार नाही.
I will immediately ask Congress for more money to support small businesses under the #PPPloan if the allocated money runs out. So far, way ahead of schedule. @BankofAmerica & community banks are rocking! @SBAgov @USTreasury
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 4, 2020