देशातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. लॉकडाऊनबाबत त्यांची मते जाणून घेतली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. लॉकडाऊनबाबत त्यांची मते जाणून घेतली.
भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांकडून केंद्र सरकार विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा संवाद महत्वाचा मानला जात आहे. शहा यांनी लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचे मत आणि विचार जाणून घेतले. ३१ मेनंतर लॉकडाऊनबाबत राज्यांची भूमिका काय आहे. त्यांच्या सूचना काय आहेत, हे शहा यांनी समजून घेतलं. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबाबत सरकारचे मंथन सुरू आहे.
लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देऊन अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण चीनी व्हायरसचे हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता कमी आहे. देशात ११ शहरांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. यामध्ये दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सुरत आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. देशातील ७० टक्के रुग्ण याच शहरांमध्ये आहेत. त्यामुळे येथे लॉकडाऊनची सक्ती कायम राहू शकते.