लाउडस्पीकरवर अजान लावल्यामुळे इतरांना त्रास होतो, हे बंद करायला हवे असे वक्तव्य केल्याने प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरुध्द कट्टरपंथियांची ट्रोलधाड सुरू झाली आहे. अजानला विरोध केल्याने कॅनडातील एका भारतीयावर नुकताच सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला होता.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : लाउडस्पीकरवर अजान लावल्यामुळे इतरांना त्रास होतो, हे बंद करायला हवे असे वक्तव्य केल्याने प्रध्दि गीतकार जावेद अख्तर यांच्याविरुध्द कट्टरपंथियांची ट्रोलधाड सुरू झाली आहे. अजानला विरोध केल्याने कॅनडातील एका भारतीयावर नुकताच सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे.
जावेद अख्तर यांनी इतरांना होणाऱ्या त्रासामुळे लाउड स्पीकरवर अजान देण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारतात 50 वर्षापुर्वीपर्यंत लाउडस्पीकरवरुन अजान देणे ‘हराम’ होते, पण नंतर हे ‘हलाल’ झाले आणि इतके ‘हलाल’ की, याची मयार्दाच नाही. परंतू, याचा अंत व्हायला हवा. अजानचा काहीच त्रास नाही, पण लाउडस्पीकरमुळे इतरांना त्रास होतो. मला आशा आहे की, याबाबत ते स्वत: काही करतील, असे अख्तर यांनी म्हटले आहे.
मात्र, त्यानंतर कट्टरपथियांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे. एकाने तर म्हटले आहे की, तुमच्या सल्याला असहमती दर्शवतो. इस्लाम आणि या धमार्ला मानणाऱ्या लोकांबाबत अशी टीका करू नका. आम्ही दरवेळेस मोठ्या आवाजात गाणे लावत नाही, शैतानाच्या हातात आम्ही खेळत नाहीत. अजान कोणाला प्रार्थना आणि चांगल्या आयुष्याकडे वळवण्याचा उत्तम पर्याच आहे.
अख्तर यांनीही या ट्रोलर्सना उत्तर देताना म्हटले आहे की, तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की ते सर्व इस्लामिक विद्वान ज्यांनी 50 वर्षे लाउडस्पीकरला हराम घोषित केले होते, ते सर्व चूक होते. हिम्मत असेल, तर असे बोलून दाखवा. नंतर मी तुम्हाला त्या सर्व इस्लामिक विद्वानांचे नाव सांगेन.
यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये गायक सोनू निगमने लाउडस्पीकरवर अजान चालवण्याचा विरोध केला होता. याबाबत त्याने अनेक ट्वीट केले होते. त्याने लिहीले होते की, ‘देव सर्वांचे भले करो. मी एक मुस्लिम नाही, पण मला सकाळी अजानच्या आवाजाने उठावे लागते. भारतात कधीपर्यंत ही जबरदस्तीची धार्मिकता चालेल. मी मंदिरात किंवा गुरुद्वारामध्येही विजेच्या उपकरणांच्या मदतीने उठवण्याचा विरोध करतो. ही गुंडगिरी आहे.