अभाविप आक्रमक , धोरणावर टीका
विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केले.
स्वप्नील लोणकर याने राज्य सेवा आयोगाची परीक्षा पास केली. पण त्याला नोकरी मिळत नव्हती. या मानसिक तणावमुळे स्वप्नीलने राहत्या घरी आत्महत्या केली. त्याचे पडसाद राज्यात मोठ्या प्रमाणात उमटले. त्यांनतर अनेक विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. एमपीएससीच्या धोरणाचा हा बळी ठरल्याची प्रतिक्रिया राज्यातील विद्यार्थ्यांत उमटली होती. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. फलक झळकून राज्य सरकारचा निषेध केला आहे.
- स्वप्नील लोणकर आत्महत्येनंतर विद्यार्थी संतप्त
- अभाविपचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
- सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध
- एमपीएससीच्या धोरणाचा स्वप्नील ठरला बळी
- राज्यातील अनेक विद्यार्थी झाले आक्रमक