- ‘टेरर फंडिंग’मधून तीन कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) माजी विद्यार्थिनी शेहला रशीदचे वडील अब्दुल रशीद यांनी आपल्या मुलीवर गंभीर आरोप केले आहेत. आपली मुलगी ज्या पद्धतीने भरपूर पैसा खर्च करून एनजीओ चालवित आहे, तेथूनच तिचे दहशतवाद्यांशीही संबंध असू शकतात हे स्पष्ट आहे. ती देशद्रोही बनली असल्याचे सांगून केंद्रीय एजन्सीकडे चौकशीची मागणी केली आहे. shehla rashid news
शहला रशीदच्या वडिलांनी म्हटलं की, ‘जे लोकं आज एनआयएला टेरर फंडिंग प्रकरणात अटकेत आहेत. मग ते कोणीही राजकारणी असो किंवा व्यापारी. यांचा कुठेतरी दहशतवादी कारवायांमध्ये देखील हात असू शकतो. तिने असं का केलं हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. मी तिला बऱ्याच वेळा समजावून सांगितले की या सर्व गोष्टींपासून तिने दूर राहावे. परंतु आता मला जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. आपल्याला तोंड बंद ठेवण्यासाठी पैशांची ऑफर केली जात होती. shehla rashid news
आपली पत्नी जुबैदा शौर, मोठी मुलगी आसमा रशीद और एक पोलीस कर्मचारी साकिब अहमद हे देखील शेहलाला सामील आहेत. २०१७ मध्ये शेहला अचानक काश्मीरच्या राजकारणात सामील झाली.
पहिल्यांदा ती नॅशनल कॉन्फरन्समध्ये होती. त्यानंतर जेकेपीएममध्ये सामील झाली. दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याच्या आरोपावरून याअगोदर इंजिनिअर रशीद आणि जुहूर वटाली अटकेत आहेत. या नेत्यांनी माझ्या मुलीला नव्या पक्षात सामील होण्यासाठी तीन कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचे आश्वासन दिले.
shehla rashid news
या दोन्ही नेत्यांनी तिला वटाली येथील आपल्या घरी बोलावले होते. मी त्यावेळीच सांगितले होते की ती चुकीच्या मार्गावर जात आहेत, असे सांगून रशीद म्हणाले, तिचा वापर होत आहे. पण तिने मला गप्प बसविले. तिने सांगितले की पैसे घेतले आहेत आणि ते सुरक्षित ठिकाणी पाहोचले आहेत.
शहलाने म्हटलं की, वडिलांनी व्हिडिओमध्ये जे आरोप केले आहेत. ते जुने प्रकरण आहे. हा राजकीय नाही तर कौटुंबिक वाद आहे. जेव्हा पासून कोटार्ने त्यांना आमच्या घरापासून लांब राहण्यासाठी सांगितलं आहे. तेव्हापासून ते अशा प्रकारच्या हरकती करुन कायदेशीर प्रक्रियेला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.