- काम वेळेत पूर्ण करण्याचे उध्दव ठाकरेंचे आदेश
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : घरातच बसून राहणाची टीका सहन करणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज अखेर घराबाहेर पडले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गावर आपले हेलिकॉप्टर लॅंड केले. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा शासकीय होता, त्याच्या चर्चेत मात्र मुख्यमंत्र्यांच्या कृतीतून राजकीय रंग भरले गेले. devendra fadnavis news
उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने अमरावती येथून वैजापूर तालुक्यातील गोलवाडीला आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा त्यांनी गोलवाडी परिसरात घेतला. त्यानंतर स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. devendra fadnavis news
परंतु, औरंगाबाद जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची एण्ट्री झाल्याबरोबर एका राजकीय मुद्द्याची चर्चा सुरू झाली ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर शिक्कामोर्तब केले की काय? कारण उद्धव ठाकरे यांनी आपले हेलिकॉप्टर चक्क समृद्धी महामार्गावर लँड केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट ठरलेल्या समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्र्यांनी विश्वास टाकल्याच्या राजकीय चर्चेला उधाण आले. devendra fadnavis news
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाचा मुद्दा चांगलाच तापला होता. कारण या महामार्गाला अनेकदा विरोध झाला. मात्र या विरोधानंतरही फडणवीस यांनी महामार्गाचे काम जोमात सुरूच ठेवले. त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी थेट या महामार्गावर हेलिकॉप्टर लँड करत महामार्गाच्या दर्जावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी राजकीय चर्चा रंगते आहे.
devendra fadnavis news
या महामार्गाच्या आढाव्याच्या वेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 बाबत सविस्तर सादरीकरण उद्धव ठाकरे यांच्यासमोर करण्यात आले. त्यानुसार हे सगळे काम फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत सुरू झाले आहे. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 किलोमीटर धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींचा यात समावेश आहे. याची तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
समृद्धी महामार्ग प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आदेश
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅकेज 10 अंतर्गत कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत हा प्रकल्प महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.