• Download App
    कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ओबीसींना भडकाविण्याचा प्रयत्न | The Focus India

    कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ओबीसींना भडकाविण्याचा प्रयत्न

    राज्यातील महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात पुरेशा ताकदीने बाजू मांडली नसल्याने मराठा आरक्षण धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला भडकाविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    जालना : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात पुरेशा ताकदीने बाजू मांडली नसल्याने मराठा आरक्षण धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला भडकाविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  congress rashtravadi leader obc reservation

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी नुकताच पुण्यात ओबीसींच्या हक्कांसाठी मोर्चा काढला होता. आता कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मोठे विधान केले आहे. मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं आहे. जर असा प्रयत्न झालाच तर मंत्री पद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे ते म्हटले आहेत. ओबीसी मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटलं की, ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू.

    congress rashtravadi leader obc reservation

    विजय वड्डेटीवार जिवंत आहे तोवर धक्का लावायचा विषय नाही. वाटेल ते काय काढायचं असेल तर काढू आपल्याकडे घोंगड आहे आणि काठी पण आहे. कोणाला कितीही देऊ द्या पण आमच्या हक्काचं नको. आमच्या वाट्याचं आरक्षण देऊ नका. आमच्या वाट्याला धक्का लावू नका, ही आमची विनंती आहे.

    महाविकास आघाडीत बेदिली, राष्ट्रवादीच्या खासदाराविरुध्द शिवसेना आमदाराचा हक्कभंग प्रस्ताव

    भाजपच्या हातात सत्ता द्या मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असं काही भाजप नेते वक्तव्य करत आहेत. मात्र फडणवीस काय सुप्रीम कोर्ट आहे काय? अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. आरक्षणाचा विषय आता राज्य सरकारच्या हातात नाही. हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर कोण सुप्रीम कोर्टात गेलंस, त्यावेळी कोण्या शुक्राचार्याने बाजू मांडली माहिती नाही. मात्र हे मराठा समाजाचं दुर्देव असून फडणवीस काय सुप्रीम कोर्ट नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का