- बॉलिवूड पळवून नेतेच कोण?; पण बॉलिवूडला सक्षम पर्याय उभा राहू शकतो यूपीत
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत. त्यांनी लखनौ महापालिकेचे २०० कोटी रूपयांचे बॉंड मुंबई शेअर बाजारात लिस्ट केले. ते बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमारला भेटलेत. बॉलिवूड पर्सनॅलिटीज, उद्योगपतींशी त्यांच्या अन्य भेटीगाठी देखील सुरू आहेत. akshay kumar news पण महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष कधी नव्हे एवढी त्यांच्या बॉलिवूड भेटीवर हायतोबा माजवित आहेत.
जणू काही एका भेटीतच योगी मुंबईतले बॉलिवूड पळवून नेतील अशी वातावरण निर्मिती करण्यात येतेय. पण मूळात बॉलिवूडला योगी पळवून नेण्याची भीती वाटतेय की हिंदी चित्रपटसृष्टीतील आपली मक्तेदारी तुटण्याची भीती बॉलिवूडला निर्माण झाली आहे?, हा खरा प्रश्न आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. akshay kumar news
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि पाठोपाठ मनसे देखील योगींच्या विरोधात आक्रमक झाली आहे. मनसेने गंगू तेली म्हणून त्यांची हेटाळणी केली आहे. पण या सगळ्यात किरकोळ राजकारणाचा धुरळा उडविण्यापेक्षा मोठे काही नाही. कारण मूळात योगी अख्खे बॉलिवूड उचलून न्यायला आलेच नाहीत. आणि आले असले तरी कारण तसे करणे त्यांना शक्य नाही. कारण बॉलिवूडची पाळेमूळे मुंबईत घट्ट आहेत. त्यासाठी मूळ मुंबईपेक्षा पंजाबी आणि उत्तर भारतातील कलावंतांनी आपले रक्त आटवले आहे. akshay kumar news
व्ही. शांताराम आणि अन्य काही मराठीजन याला नक्कीच अपवाद आहेत. त्यांचे १०० टक्के बॉलिवूडचा वृक्ष सिंचनात आणि फोफावण्यात योगदान आहे. पण आत्ता योगींच्या बॉलिवूड दौऱ्यावरून हायतोबा माजविणाऱ्यांचे त्यात काहीही योगदान नाही. राजकीय नेत्यांचे तर नाहीच नाही.
या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार दिली ठाकूर यांनी परखड मत मांडलेय. बॉलिवूड कोणी उचलून नेण्याचा हा प्रश्नच नाही. तसे कोणी नेऊ देखील शकत नाही. कारण गेल्या १०० वर्षांत बॉलिवूडची पाळेमूळे मुंबईत घट्ट रूजली आहेत. कलावंतांच्या पिढ्या येथे घडल्या आहेत. त्याच्यातील गुणदोषांसकट बॉलिवूड येथेच राहील, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
पण प्रश्नही या पुढचा आहे. तो अधिक गंभीर आहे. ज्या हिंदी चित्रपटसृष्टीचे बॉलिवूड प्रतिनिधित्व करते, किंबहुना ज्या हिंदी चित्रपट सृष्टीलाच बॉलिवूड हे नामाभिधान आहे, त्या बॉलिवूडची येथे मक्तेदारी आहे. उत्तर भारतात छोटी भोजपुरी फिल्म इंडस्ट्री आहे. पण ती बॉलिवूडचा पर्याय ठरू शकत नाही.
akshay kumar news
आणि येथेच नेमकी योगींच्या ब़ॉलिवूड दौऱ्याची मेख असल्याचे वाटते. योगी यूपीतील नोएडात फिल्मसिटी उभारतील तर ती बॉलिवूडला समर्थ पर्याय म्हणून यूपीवाल्यांच्या टर्म्स आणि कंडिशन्शनुसार उभी राहील. तेथे ब़ॉलिवूडच्या टर्म्स आणि कंडिशन्स चालणार नाहीत. बॉलिवूडने तयार केलेल्या सिनेमा संस्कृतीतले दोष योगींचे यूपीवाले स्वीकारणार नाहीत. एकूण हिंदी चित्रपटसृष्टीतले बॉलिवूडचे “एकमेवाव्दितीयत्व” तुटेल म्हणजेच बॉलिवूडची हिंदी चित्रपटसृष्टीतील मक्तेदारी तुटेल, ही बॉलिवूडच्या आणि महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांनी हायतोबा माजविण्यामागची खरी भीती आहे. योगी बॉलिवूड पळवायला आलेत, ही हूल उठविण्यामागचे हे खरे इंगित आहे.