विशेष प्रतिनिधी
लखनौ : ६ हजार बसच्या १० हजार फेऱ्या करून साडेसात लाख लोकांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्याची किमया उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने साधली आहे. एरवी चमत्कार वाटावा अशी कामगिरी काटेकोर नियोजन आणि अचूक अंमलबजावणीमुळे शक्य झाली आहे.
शिस्त आणि कामातील ढिलाई यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन देशात कुप्रसिद्ध होते. योगींच्या काळात या प्रतिमेत बदल घडतोय. प्रशासन कात टाकतय, अशी चिन्हे दिसली आहेत. आधी पोलिस आणि आता परिवहन खाती यांच्यातील बदल लोकांना ठळकपणे दिसत आहेत.
इतर राज्यांमध्ये अडकलेल्या मजूर, कामगार, विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक यांना आपापल्या राज्यांमध्ये परतण्याची परवानगी केंद्र सरकारने दिल्यानंतर उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगींच्या नेतृत्वाखाली परिवहन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम कार्यरत झाली. ठिकाणे, प्रवासी संख्या, बससंख्या, प्रवासाच्या वेळा आणि फेऱ्यांची संख्या यांचे अचूक नियोजन करण्यात आले.
दिल्ली सीमेवरील गावे, मथुरा, आग्रा, प्रयागराज, राजस्थानमधील कोटा, हरियाणातील गावे, मध्य प्रदेशातील गावे येथे संंबंधित राज्यांशी आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून नियोजनानुसास बस पाठविण्यात आल्या. ICMR प्रोटोकॉलनुसार चाचण्या करून, सोशल डिस्टंसिंग पाळून प्रवाशांना उत्तर प्रदेशात परत आणण्यात आले व त्यांना आपापल्या गावी पाठविण्यात आले.
या मोहिमेचे नेतृत्व उत्तर प्रदेश परिवहन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजशेखर यांनी केले. त्यांच्या टीममध्ये जयदीप वर्मा, राजेश वर्मा, पल्लव बोस, गौरव वर्मा आणि शशिकांत सिंह या अधिकाऱ्यांचा समावेश होता.