• Download App
    १३ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना आणण्याचे नियोजन | The Focus India

    १३ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना आणण्याचे नियोजन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमुळे १३ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना मायदेशी परत आणण्याचे नियोजन करण्यात आले असून ६४ विमाने उड्डाणे करण्यात येणार आहेत. नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी ही माहिती दिली. ज्यांच्या तपासणीत कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत, अशाच भारतीयांना संबंधित देशांमधून परत आणण्यात येईल.

    परदेशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्याचा हा पहिला टप्पा आहे.

    मालदीव, संयुक्त अरब अमिरातीत अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी तीन जहाजे रवाना करण्यात आली आहेत.
    १३ देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करणे, चाचण्या करून त्यांना नियोजित स्थळी पाठविणे याचेही समांतर नियोजन करण्यात आले आहे.

    ६४ विमान उड्डाणांपैकी १० विमाने संयुक्त अरब अमिराती, ७ विमाने ब्रिटन, ५ विमाने सौदी अरेबिया, २ विमाने कतार, ५ विमाने सिंगापूर, ७ विमाने अमेरिका, ५ विमाने फिलिपीन्स, ७ विमाने बांगलादेश, ७ विमाने मलेशिया, ५ विमाने कुवेत, २ विमाने बहारिन, २ विमाने ओमान या देशांमध्ये उड्डाण करतील. सर्व विमाने एकाच दिवशी उड्डाणे करणार नाहीत.

    पहिल्या १० विमानांमधून २३०० भारतीयांना परत आणण्यात येईल, तर दुसऱ्या दिवशी २०५० भारतीयांना परत आणण्यात येईल. ही विमाने ही विमाने दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, कोची, मुंबई, अहमदाबाद येथील विमानतळांवर ९ देशांमधून भारतीयांना परत घेऊन येतील.

    अशाच स्वरूपाचे नियोजन करून पुढचे चार दिवस दररोज साधारण २ हजार ते अडीच हजार भारतीयांना परत आणण्यात येईल.

    लंडन ते भारतातील कोणताही नियोजित विमानतळ या प्रवासासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, तर अमेरिकेतील शिकागो ते दिल्ली, हैदराबाद विमानतळ या प्रवासासाठी प्रत्येकी १ लाख रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. प्रवाशांनी हे पैसे भरून तिकीटे काढायची आहेत.

    संबंधित देशांमधील दूतावासातील विशिष्ट फॉर्मची नोंदणी करावी लागेल. कोरोना संक्रमण झाले नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र फॉर्मला जोडावे लागेल. तरच प्रवासासाठी परवानगी मिळेल.

    भारतात उतरताच प्रत्येक प्रवाशाचे स्क्रिनिंग केले जाईल. त्याला १४ दिवस क्वारंटाइन केले जाईल. तसेच प्रत्येक प्रवाशाला आरोग्य सेतू app मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे अनिवार्य असेल. त्या द्वारे पुढील १४ दिवस प्रवाशाचा वैद्यकीय track ठेवला जाईल.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का