• Download App
    विशेष न्यायालयाने नाकारला प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन | The Focus India

    विशेष न्यायालयाने नाकारला प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन

    कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी कोठडीत असलेल्या प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा हंगामी जामीन अर्ज विशेष न्यायालयानं फेटाळला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयानं जामीन नाकारताना ८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी कोठडीत असलेल्या प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा हंगामी जामीन अर्ज विशेष न्यायालयानं फेटाळला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयानं जामीन नाकारताना ८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे.

    तेलतुंबडे यांनी आपले वकील आर. सत्यनारायण आणि आरिफ सिद्दीकी यांच्या मार्फत विशेष न्यायालयात हंगामी जामीनासाठी याचिका दाखल केली होती. तेलतुंबडे यांची प्रकृती चांगली नसून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हंगामी जामीन देण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात आली होती. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचं सांगत एनआयएनं विरोध केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं तेलतुंबडे यांचा जामीन फेटाळून लावत ८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

    भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखाचा अटकपूर्व जामीन अर्ज 16 मार्चला फेटाळला होता. भीमा कोरेगाव हिंसाचार आणि शहरी माओवाद संदर्भात आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा हे दोघे आरोपी आहेत.

    गेल्या दीड वर्षांपासून विविध कोर्टाच्या माध्यमातून अटकेपासून दोघे संरक्षण घेत होते. सर्वोच्च न्यायालयाने प्रा. तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळा होता. न्यायालयाने त्यांना तीन आठवड्याच्या आत आत्मसमर्पण करा असा आदेश दिला होता. तेलतुंबडे यांनी १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशीच आत्मसमर्पण केले होते. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबत होते.

    भीमा कोरेगाव हिसांचार प्रकरणाचा तपास सध्या राष्ट्रीय तपास संस्था करत आहे. प्रा. तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्यावर न्यायालयाने सगळया पुराव्याचे अवलोकन केले. एनआयएने आपली बाजू मांडत जामीनाला कडाडून विरोध केला.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का