विशेष प्रतिनिधी
मुंबई : पालघर जिल्ह्यात साधूंचे सेक्युलर लिंचिंग करण्यात राष्ट्रवादी आणि कम्युनिस्टांची अभद्र युती दिसलीच पण यात प्रामुख्याने शिवसेनेची वैचारिक फरफटही दिसून आली. हत्या झालेल्या साधूंचे प्रकरण केवळ भाजपनेच आता लावून धरले असे नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अयोध्या दौऱ्यात जोरदार स्वागत करणाऱ्या साधू समाजानेही ते उचलून धरल्याने ठाकरे यांची राजकीयदृष्ट्या कोंडी झाली आहे.
१६ एप्रिलला रात्री ही घटना घडताना राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य विष्णू पातरा, सुभाष पावर आणि धर्मा पावर हे तिथेच हजर होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्याचे ट्विट भाजपचे नेते सुनील देवधर यांनी केले आहे.
एकीकडे राष्ट्रवादी आणि कम्युनिस्टांचे स्थानिक नेते साधूंच्या मॉब लिंचिंग मध्ये सामील होतात तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मवाळ भूमिका घेत सीआयडी चौकशी चालू असल्याची सारवासारव करतात. दुर्दैवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आपली सारी हिंदुत्वाची आक्रमकता विसरून आणि राजकीय प्रकल्भता विसरून राष्ट्रवादीच्या करणीपुढे हतबल झालेले दिसतात. या सर्व प्रकारात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एकच वक्तव्य देऊन जवळ जवळ आपले हात झटकून मोकळे झाले.
इस भयावह विडीओ में ये जो शख़्स पीले और सफ़ेद T Shirt में खड़ा है ..कोई महाराष्ट्र का व्यक्ति बता सकता है ये कौन है?
— Sambit Patra (@sambitswaraj) April 20, 2020
इससे भी गुत्थी सुलझेगी। pic.twitter.com/tzhbOYefMd
महाराष्ट्रात तीन पक्षांची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीचे मूळ राजकीय मस्तीखोरीचे रूप पुन्हा उघड व्हायला लागले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला झालेली मारहाण, वांद्रे येथील जमाव गोळा प्रकरणी अटक झालेला विनय दुबे आणि पालघर सेक्युलर लिंचिंगच्या वेळी तिथे हजर असणारा काशीनाथ चौधरी या प्रत्येक घटनेत राष्ट्रवादीचा संबंध दिसतो.
प्रत्येक वेळी मीडियात याची तावातावाने चर्चा होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते चर्चेत सामील होतात. पण त्यांचे मोठे नेते आणि म्होरके या चर्चेपासून बाजूला राहून आपल्या गळ्यातले झेंगट शिवसेनेच्या आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात टाकताना दिसतात. या सर्व प्रकारात सत्तेच्या दगडाखाली हात अडकल्याने उद्धव ठाकरे उघड दिसत असूनही राष्ट्रवादीवाल्यांना ना जाब विचारू शकतात, ना कारवाई करू शकतात…!!
शरद पवारांचा तर प्रश्नच उद्भवत नाही. हत्या हिंदू साधूंची झाली आहे. त्यात कोणी तबलिगी असल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही. त्यातही तिथे उपस्थित असलेला काशीनाथ चौधरी हा त्यांच्या पक्षाचा झेडपी सदस्य आहे. त्यामुळे पवार “शांत राहून काम करणार” हे उघड गुपित आहे…!!