Tuesday, 6 May 2025
  • Download App
    पालघरमध्ये राष्ट्रवादी - कम्युनिस्ट - ख्रिश्चन मिशनरी Nexus होतय उघड | The Focus India

    पालघरमध्ये राष्ट्रवादी – कम्युनिस्ट – ख्रिश्चन मिशनरी Nexus होतय उघड

    दोन साधूंचे पालघरमधील तथाकथित सेक्युलर लिंचिग आता कनव्हर्जन लिंचिंग असल्याचे उघड होत आहे. या प्रकरणाचे वेगवेगळे कोन तपासत असताना आणि त्यावर पांघरूण घालायचे प्रयत्न चालू असताना यातील ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून होणाऱ्या आदिवासींच्या धर्मांतराचा वादग्रस्त मुद्दा पुढे येत आहे.


    विनय झोडगे

    पालघरच्या सेक्युलर लिंचिंगमधील धर्मांतराचा मुद्दा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि उत्तर प्रदेशातील बागपतचे भाजप खासदार सत्यपाल सिंह यांनी पुढे आणला आहे. हा आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला किंबहुना महाराष्ट्र सरकारने झाकण्याचा प्रयत्न केलेला ख्रिश्चन मिशनऱ्यांचा अँगल त्यांनी ठळकपणे समोर आणला आहे.

    राजकारण्यांनी संबंधित मुद्दा उचलून धरून भांडणे आणि सत्यपाल सिंह यांच्या सारख्या अत्यंत वरिष्ठ अधिकारपदावर राहिलेल्या व्यक्तीने धर्मांतराचा मुद्दा पुढे आणणे या दोन्हींमध्ये गुणात्मक फरक आहे. सत्यपाल सिंह हे मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या अन्य भागातही सेवा बजावलेले अधिकारी आहेत. पोलिसांचे आणि महाराष्ट्राचे बरेच in – outs त्यांना बारकावे आणि तपशीलासह माहिती आहेत.

    पालघरच्या आदिवासी भागात सेवाकार्याच्या आणि charity च्या नावाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून धर्मांतराचे काम चालते, याकडे सत्यपाल सिंह यांनी ठळकपणे बोट दाखविले आहे. या प्रकरणाची राज्य पातळीवरची सीआयडी चौकशी अपुरी आहे. ती केंद्रीय पातळीवरील संस्थेकडूनच झाली पाहिजे, असे मत त्यांच्या सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदविणे याला फक्त राजकीय अँगल अाहे, असे म्हणून उडवून लावता येणार नाही कारण तेथील बरेच गुंतागुंतीचे आणि फार वरपर्यंत पोहोचणारे धागेदोरे सत्यपाल सिंह यांना माहिती असणार आहेत.

    राष्ट्रवादीचे आणि कम्युनिस्टांचे स्थानिक नेते या ख्रिश्चन मिशनऱ्यांचे supporters आहेत. किंबहुना राष्ट्रवादीचा झेडपी सदस्य काशीनाथ चौधरी आणि कम्युनिस्ट पार्टीचे तीन पंचायत सदस्य साधूंच्या लिंचिंगच्या वेळी हजर होते. त्यांनी जमावाला रोखण्यासाठी काहीच केले नाही, असे सरपंच चित्रा चौधरी यांनी सांगितले आहे.

    या पार्श्वभूमीवरच सत्यपाल सिंह यांनी तेथील राष्ट्रवादी – कम्युनिस्ट – मिशनरी Nexus कडे बोट दाखविले आहे. साधूंचे लिचिंग हा हिंदुस्थानी संस्कृतीवर हल्ला असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. यातच या नृशंस हत्येचे इंगित सापडते.

    अर्णवी चर्चेत उद्धव – सोनिया सरकारचा वारंवार उल्लेख होतो. हा देखील मिशनरी कारवायांचा सूचक उल्लेख आहे पण हे करताना त्यातून राष्ट्रवादी – कम्युनिस्ट – मिशनरी Nexus चा अँगल सुटतोय याचेही भान ठेवले पाहिजे.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का