• Download App
    तबलिगी जमातच्या "ऑक्टोपसने" जानेवारीतच पाय पसरायला सुरवात केली; निजामुद्दीन मरकजमध्ये ९००० लोकांचा वावर; मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, कझाकस्तानचेही कनेक्शन | The Focus India

    तबलिगी जमातच्या “ऑक्टोपसने” जानेवारीतच पाय पसरायला सुरवात केली; निजामुद्दीन मरकजमध्ये ९००० लोकांचा वावर; मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, कझाकस्तानचेही कनेक्शन

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : निजामुद्दीन परिसरातील तबलिगी जमातच्या मरकजवर २८ मार्चला झालेली कारवाई हिमनगाचे टोकच होती कारण त्यावेळी फक्त १५०० च्या आसपास लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तबलिगी मस्तीखोरीची चौकशी जसजशी खोलात जाऊ लागली आहे, तसतसे त्यांचे वेगवेगळे कारनामे समोर येऊ लागले आहेत. तबलिगी जमातच्या मरकजमध्ये जानेवारीपासूनच लोकांची वर्दळ वाढू लागली होती. सुरवातीला हा आकडा काही शेकड्यांमध्ये वाटत होता पण प्रत्यक्षात जानेवारी ते २८ मार्च २०२० पर्यंत तब्बल ९००० लोक मरकजमध्ये आल्याचे समोर आले आहे. एएनआय न्यूज एजन्सीनेच हा आकडा दिल्याने त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही. यातील परकीय नाकरिकांचा आकडा २००० असल्याचा आजचा आकडा आहे. महाराष्ट्रातून १०४५ लोक मरकज दौरा करून आल्याचाही आकडा एएनआयने दिला आहे. उरलेल्या राज्यांचा आकडाही असाच हजारांमध्ये आहे. याचा अर्थ तबलिगी जमातच्या “ऑक्टोपसने” जानेवारी ते मार्च २८ पर्यंत दिल्लीसह देशभर पाय पसरले होते आणि हे दिल्ली पोलिसांच्या नाकाखाली घडत होते, असे स्पष्ट होत आहे. तबलिगी जमातच्या लोकांचा प्रवास आणि कोरोनाचा फैलाव हे गेल्या दोन महिन्यांमध्ये देशात समांतर चालत असल्याचे हळूहळू स्पष्ट होते आहे.                       अजित डोवाल अँक्टीव मोडमध्ये आल्यावर मरकज दोन अडीच तासात खाली होणे आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यावर ९६० परकीय नागरिकांना काळ्या यादीत टाकून त्यांचे टूरिस्ट व्हिसा रद्द करणे, या वेगवान घडामोडी तबलिगी ऑक्टोपसची भयानकता स्पष्ट करतात.                       

    •  तबलिगी ऑक्टोपसने केवळ भारतातच धुमाकूळ घातला असे नाही तर फेब्रुवारीत मलेशियातील पेटलिंग मशिदीत २७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान कार्यक्रम घेतला. यात १६ हजार लोक सामील झाले. मलेशियात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. मलेशियात अजून ४ हजार लोक सापडलेले नाहीत. यात बहुसंख्य रोहिंग्या निर्वासित आहेत.
    •  इंडोनेशिया मधील मक्कसरमध्ये यानंतर तबलिग कार्यक्रम घेणार होती पण इंडोनेशिया सरकारने त्यावर बंदी घातली तरी नियोजित ठिकाणी तबलिगी जमातच्या ८ हजार लोकांनी गर्दी केली.
    •  पाकिस्तानात लाहोरमध्ये तबलिगी जमातने दीड लाख लोकांच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. पाकिस्तान सरकारने आयोजनावर बंदी घातली पण तेथे तो पर्यंत हजारो लोक जमा झाले होते. त्यांच्या वाहतुकीमुळे गाझा पट्टी पर्यंत कोरोना पसरला.
    •  ब्रुनोई, थायलंड, कझाकस्तान, कंबोडियातही तबलिगी जमातचे लोक पोहोचले. तेथील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एकदम वाढ आढळून आली.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का