• Download App
    जगातून भारतावर, मोदींवर कौतुकाचा वर्षाव | The Focus India

    जगातून भारतावर, मोदींवर कौतुकाचा वर्षाव

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चिनी विषाणूने जगातल्या प्रगत आणि श्रीमंत देशांमध्ये हाहाकार माजवला असताना तब्बल 130 कोटींच्या विकसनशील भारतात मात्र चिनी विषाणूला वेसण बसली आहे. 25 मार्चपासून 3 मे पर्यंत खंडप्राय भारतात लॉकडाऊन लागू करण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेण्याचे धैर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले. त्याचमुळे अजूनही चिनी विषाणूची साथ भारतात आटोक्यात असल्याचे जगातील धुरीणांचे मत झाले आहे. म्हणूनच विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांपासून ते जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांपर्यंत आणि बिल गेट्ससारख्या उद्योगपतींपासून ते आफ्रिकी राष्ट्रप्रमुखांपर्यंत सगळेचजण भारताच्या या निर्धाराचे आणि मोदींच्या राजकीय धैर्याचे कौतुक करु लागले आहेत.

    देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यामुळे भारावून जात गुरुवारी ट्वीट केले. त्यात ते म्हणतात – संपूर्ण जगाने पंतप्रधानांचे कौतुक केले आहे कारण “सत्य स्वयंस्पष्ट आहे.” देशातील चिनी विषाणूचा सामना करण्यासाठी देश पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सुरक्षित आहे आणि यावर माझा विश्वास आहे, असे शहा म्हणाले. मोदी ज्या प्रकारे चिनी विषाणूची साथ हाताळत आहेत,

    प्रत्येक भारतीयांची काळजी घेत आहे, एवढेच नव्हे तर या कठीण परिस्थितीत जागतिक समुदायालाही मदत करीत आहे. प्रत्येक भारतीय या संकटात स्वत: ला सुरक्षित समजतो आणि त्याच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवतो, असे शहा यांनी स्पष्ट केले.

    मायक्रोसॉफ्ट या जगविख्यात कंपनीचे सह-संस्थापक आणि अब्जाधीश समाजसेवक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आपल्या सरकारने भारतातील चिनी विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय लॉकडाउनचा अवलंब केला, अलगीकरण केले ठेवणे, काळजी घेण्यासाठी हॉट स्पॉट्स ओळखण्यासाठी केंद्रित चाचण्या वाढविल्या आणि आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी आरोग्य खर्चात लक्षणीय वाढ केली, हे कौतुकास्पद असल्याचे गेट्स यांनी सांगितले.

    आता भारताने संशोधन आणि विकास तसेच डिजिटल नाविन्यास प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन गेट्स यांनी मोदींना उद्देशून केले. गेट्स म्हणाले की, कोविड-19 च्या सूत्रानुसार भारतीय पंतप्रधानांच्या सरकारने त्याच्या अपवादात्मक डिजिटल क्षमतांचा उपयोग करून घेतल्याबद्दल मी आनंदी आहे. कोरोनाव्हायरस ट्रॅकिंग, संपर्क ट्रेसिंग आणि लोकांना आरोग्य सेवांमध्ये जोडण्यासाठी आरोग्य सेतू डिजिटल अ‍ॅप सुरू करणे महत्वाचे आहे.

    या महिन्याच्या सुरूवातीस, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसिस यांनीही पंतप्रधान मोदींनी देशभरात चिनी विषाणूच्या प्रकोपत गरिबांना मदत करण्यासाठी उचललेल्या पावलांचे कौतुक केले. “# COVID19 संकटकाळात ‘असुरक्षित लोकसंख्येला आधार देण्यासाठी 24 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजची घोषणा केल्याबद्दल पंतप्रधान @ नरेन्द्रमोदी यांचे मी कौतुक करतो. लक्षावधी वंचित लोकांसाठी मोफत खाद्यपदार्थ, घरातील गरीब महिलांना मोफत स्वयंपाकाचा गॅसमध्ये, दोन हजार रुपये थेट खात्यात जमा हे उपाय प्रशंसनीय आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का