• Download App
    जगातील ५५ देशांना भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची संजीवनी | The Focus India

    जगातील ५५ देशांना भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची संजीवनी

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कथित धमकीमुळे भारत अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरविल्याचे आरोप झाले. मात्र, अखिल मानवजातच संकटात आल्याने केवळ अमेरिकाच नव्हे तर जगातील तब्बल ५५ देशांना भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची संजीवनी दिली जात आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कथित धमकीमुळे भारत अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरविल्याचे आरोप झाले. मात्र, अखिल मानवजातच संकटात आल्याने केवळ अमेरिकाच नव्हे तर जगातील तब्बल ५५ देशांना भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची संजीवनी दिली जात आहे.

    हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध चीनी व्हायरसवर सर्वाधिक प्रभावी ठरत आहे. जगभरातून या औषधाला मोठया प्रमाणावर मागणी आहे. ट्रंप यांनी भारताकडे हे औषध देण्याची विनंती केली होती. जगातील अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी संवाद साधतानाही पंतप्रधानांकडे त्यांनी हे औषध पुरवून मदत करण्याचे साकडे घातले होते. त्यामुळे पंतप्रधानांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन वरील निर्यात बंदी उठविली.

    भारत अनेक देशांच्या मदतीला धावून गेला आहे. अमेरिकेसह ५५ देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे भारताचीही करोना व्हायरसच्या संकटाशी झुंज सुरु आहे. भारतासमोरही या आजाराने मोठे आव्हान निर्माण केले आहे. पण या संकटकाळात भारत स्वत: बरोबर इतर देशांचीही मदत करुन माणुसकीच्या धमार्चे पालन करत आहे.

    सरकारनं ५५ देशांना ह्यहायड्रोक्सीक्लोरोक्वीनह्णचा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.
    चीनी व्हायरसचा सर्वाधिक उद्रेक अमेरिकेत झाला आहे. गेल्य चोवीस तासांत दीड हजारांवर लोकांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा इटलीपेक्षाही पुढे गेला आहे.

    या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचे साकडे घातले होते. पंतप्रधान मोदींकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या पुरवण्याची विनंती ट्रंप यांनी केली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये २५ मार्च रोजी चर्चा झाली होती. त्यावेळी रशियाकडूनही या औषधांची मागणी करण्यात आली होती. संयुक्त अरब अमिरात, बहरीनला सुद्धा औषध पुरविलेआहे.

    हायड्रोक्सी क्लोरोक्विन हे औषध अँटी-मलेरिया औषध क्लोरोक्विनपेक्षा भिन्न आहे. ही एक टॅबलेट आहे जी ऑटोम्यूनसारख्या रोगांच्या उपचारांमध्ये वापरला जातो, परंतु चीनी व्हायरस रोखण्यासाठीही याचा उपयोग केला गेला आहे. सार्स-कोव्ह -2 वर या औषधाचा विशेष प्रभाव आहे. भारतामध्ये या औषधाचा पुरेसा साठा असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारताकडे तीन महिने पुरेल इतक्या गोळ्यांचा साठा असून या औषधाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात सुरू आहे

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का