• Download App
    केंद्राची महाराष्ट्राला भरघोस मदतच; फडणवीसांच्या आकडेवारीने ठाकरे सरकार तोंडावर | The Focus India

    केंद्राची महाराष्ट्राला भरघोस मदतच; फडणवीसांच्या आकडेवारीने ठाकरे सरकार तोंडावर

    २८,१०४ हजार कोटी रूपये थेट मदत, केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला जो निधी उभारता येऊ शकतो तो १ लाख ६५ हजार कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील ७८ हजार ५०० कोटी रूपये असे एकूण २ लाख ७१ हजार ५०० कोटी रूपयांचा लाभ महाराष्ट्राला होऊ शकतो.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्राने महाराष्ट्राला विविध मार्गांनी २८ हजार कोटी रुपयांची थेट मदत केली आहे. १ लाख ६५ हजार कोटी रुपयांपर्यंतचे आरबीआयकडून कर्ज उचलण्याची मर्यादा वाढवून दिली आहे. महाआघाडी सरकार उगाच केंद्राकडे बोट दाखवून महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची ओरड करत आहे, अशी स्पष्टोक्ती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. सरकार आपापसातील मतभेदांमुळे पडेल, असेही त्यांनी सूचित केले.

    विडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेमधील ठळक मुद्दे असे :

    • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून या तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले.
      गहू : १७५० कोटी रूपये, तांदूळ : २६२० कोटी रूपये,
      डाळ : १०० कोटी रूपये, स्थलांतरित मजुरांसाठी १२२ कोटी रूपये.
      एकूण : ४५९३ कोटी रूपये
    • प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत १७२६ कोटी रूपये, जनधन योजनेच्या माध्यमातून १९५८ कोटी रूपये, विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ११६ कोटी रूपये असे एकूण ३८०० कोटी रूपये केंद्र सरकारने दिले.
    • उज्ज्वला गॅस योजनेत ७३ लाख १६ हजार सिलेंडरसाठी १६२६ कोटी रूपये, ६०० रेल्वेगाड्यांसाठी ३०० कोटी रूपये, बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण १००१ कोटी रूपयांची मदत केली.
    • एसडीआरएफमध्ये १६११ कोटी रूपये आणि आरोग्यासाठी ४४८ कोटी रूपये असे एकूण २५५९ कोटी रूपये दिले.
    • व्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून ५६४८ कोटी रूपये देण्यात आले.
    • त्याच बरोबर शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी पुढील प्रमाणे : कापूस : ५६४७ कोटी रूपये, धान – तांदूळ : २३११ कोटी रूपये, तूर : ५९३ कोटी रूपये, चणा/मका : १२५ कोटी रूपये, तसेच पीकविम्यासाठी ४०३ कोटी रूपये असे एकूण ९०७९ कोटी रूपये देण्यात आले. हा संपूर्ण खर्च पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात २८, १०४ कोटी रूपये दिले आहेत, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करवून दिली.
    • महाराष्ट्राला आरोग्यासाठी मिळालेली मदत : हायड्रोक्सिक्लोरोक्विन : ४७ लाख २० हजार, प्रयोगशाळांना मान्यता : शासकीय ४१, खाजगी ३१, पीपीई किटस : ९ लाख ८८ हजार, एन 95 मास्क : १५ लाख ५९ हजार, आरोग्यासाठी एकूण मदत : ४६८ कोटी रूपये.
    • याखेरीज केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये एमएसएमई, गृहनिर्माण, डिस्कॉम, मनरेगा,/आरआयडीएफ, कॅम्पा एम्पॉयमेंट, स्ट्रीट वेंडर्स/फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान ७८ हजार ५०० कोटी रूपये महाराष्ट्राला मिळतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
    • “महाराष्ट्राला आतापर्यंत मिळालेत ते २८,१०४ हजार कोटी रूपये, केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला जो निधी उभारता येऊ शकतो, तो १ लाख ६५ हजार कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील ७८ हजार ५०० कोटी रूपये असे एकूण २ लाख ७१ हजार ५०० कोटी रूपयांचा लाभ होऊ शकतो.”

    आता गरज धाडसी निर्णयांची

    महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट आहे. रूग्णसंख्या/मृत्यू यात मोठी वाढ झाली आहे. आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. काल केवळ 2900 चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी 32 टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

    “राहुल गांधीजी यांचे आजचे विधान तर अतिशय गंभीर आहे. स्वत:च्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे.
    त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

    राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल, असे सांगून फडणवीस म्हणाले, “सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत.”

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का