उत्तर प्रदेशातील कामगार हे आमचे लोक आहेत. आता येथून पुढे कोणत्याही राज्याला त्यांना परत बोलावण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यांना सगळे सामाजिक आणि आणि आर्थिक अधिकार देण्याचे वचन दिल्यासच ही परवानगी दिली जाणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील त्यांच्या खास ठाकरी भाषेत योगींना सुनावले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशातील कामगार हे आमचे लोक आहेत. आता येथून पुढे कोणत्याही राज्याला त्यांना परत बोलावण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यांना सगळे सामाजिक आणि आणि आर्थिक अधिकार देण्याचे वचन दिल्यासच ही परवानगी दिली जाणार असल्याचे उत्तर प्रदेशदचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाशन असलेल्या पांचजन्य आणि ऑर्गनायझर यांच्या वतीने आयोजित ‘कोरोना संक्रमण काल; सजगता से सफलत’ या संवादात योगी बोलत होते.
योगींना फटकारताना राज ठाकरे म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर त्यांच्या सरकारची परवानगी लागेल, असे योगी आदित्यनाथ म्हणत असतील तर यापुढे महाराष्ट्रात येताना आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही, हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं.
महाराष्ट्र सरकारनेही या गोष्टींकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं. यापुढे कामगार महाराष्ट्रात आणताना नोंद करावी आणि पोलिस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि ओळख असली पाहिजे, तरच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश द्यावा, अशीही सूचना राज ठाकरे यांनी केली आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले, काही राज्यांनी लॉकडाऊनच्या काळात उत्तर प्रदेशातील स्थलांतरीत कामगारांकडे लक्ष दिले नाही. त्यांना आवश्यक सुविधा पुरविल्या नाहीत. त्यामुळेच त्यांना या राज्यांमधून पलायन करावे लागले. पण हे कामगार आमची संपत्ती आहे. त्यांची कौशल्याच्या आधारावर नोंदणी केली जाणार आहे. सर्वांना रोजगार दिला जाणार आहे. यासाठी स्थलांतरण आयोग नेमला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही पातळीवर त्यांचे शोषण होणार नाही.
योगी म्हणाले, आत्तापर्यंत २३ लाख स्थलांतरीत मजुर-कामगार उत्तर प्रदेशात परत आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मुंबई आणि दिल्लीतून आहेत. त्यातील काही जणांना चीनी व्हायरसची बाधा झाली आहे. यामध्ये ७५ टक्के महाराष्ट्रातून आले आहेत.
उत्तर प्रदेशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगून योगी आदित्यनाथ म्हणाले, जर्मनीतील एक कंपनी चीनमधील आपली कंपनी उत्तर प्रदेशात आणत आहे. आग्रा येथे ही कंपनी बुटांची फॅक्टरी सुरू करणार आहे. यातून ३० लाख बुटांची निर्मिती होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच लॉकडाऊनचा निर्णय चीनी व्हायरसची बाधा झालेल्यांची संख्या वाढली नाही. आपण एका मोठ्या धोक्यातून वाचलो आहोत, असे सांगून योगी म्हणाले, या संकटातील स्थितीवर एक आठवड्याच्या आत नियंत्रण मिळविले जाईल. संपूर्ण देशाच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील स्थिती खूप चांगली आहे. चांगले पिक आल्यामुळे उत्तर प्रदेशातील परिस्थिती चांगली झाली आहे
मेहनत कर अपनी जीविका चलाने वाले 23 लाख श्रमिक बहनों- भाइयों और उनके परिजनों को अब तक घर वापस लाया गया है। सभी का स्वास्थ्य परीक्षण कर उन्हें उपयुक्त रूप से क्वारंटीन करने, खाद्यान्न किट देने, राशन कार्ड बनवाने और ₹1,000 भरण-पोषण भत्ता दिए जाने के निर्देश दिए गए हैं।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 24, 2020