विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने प्रत्येक जिल्ह्यात कोविड १९ स्पेशल हॉस्पिटल तयार केली असून त्यात १ लाख बेड तयार करण्यात आले आहेत.
दररोज १०००० जणांची कोविड चाचणीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून २० जून पर्यंत रोज २० हजार चाचण्यांपर्यंत पोचायचे आहे.प्रत्येक तालुक्यात टेस्ट लॉब तयार होत आहे.
या हॉस्पिटलच्या १, २,३ अशा लेवल तयार करण्यात आल्या असून वैदयकीय गरजेनुसार पेशंट भरती करण्यात येतील. १ लाख कोविड बेड तयार करणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे.