विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून जितेंद्र आव्हाड यांना त्वरीत डच्चू द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आव्हाड यांच्या ‘नाथ’ बंगल्यावर आव्हाड यांच्या उपस्थितीत एका अभियंत्याला अमानुष मारहाण करण्यात आली. आव्हाड यांच्या अंगरक्षकांनी आणि अज्ञात व्यक्तींनी चक्कर येईपर्यंत मारल्याची तक्रार संबंधित तरुणाने केली होती. या संदर्भात राज्यात आव्हाड यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे की, एखाद्या व्यक्तीला, मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत मारहाण करणे ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आव्हाड यांना तात्काळ बडतर्फ करावे.
“सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही.
न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे. संबंधित तरुणाने आव्हाड यांच्या विरोधात सोशल मीडियात टीका केल्याची तक्रार आहे.
दरम्यान, फडणवीस यांच्या या मागणीनंतर नेटकरी देखील आव्हाड यांच्यावर तुटून पडले आहेत. यातील काही मोजक्या प्रतिक्रिया –
-मागिल ५ वर्षात असे कधीच झाले नव्हते. तिघाडीच्या हाती सत्ता येताच हे बावरले आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहे हे सरकार ..!!
त्या नालायक माणसावर कारवाई झालीच पाहीजे.