विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या परिणामकारक मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे वरळी मॉडेलचा प्रचार करताहेत. त्यांना राज्यातील काही मीडिया हाऊसची साथ मिळाली आहे. पण त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र गोवा मॉडेल फॉलो करायला सांगत आहेत.
कोरोनामुक्त होणारे गोवा हे पहिले राज्य ठरले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी WHO, केंद्र सरकार यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे पाळून आणि मेडिकल प्रोटोकॉल अमलात आणून विशिष्ट कालावधीत गोव्याला कोरोनामुक्त केले. त्यांनी राज्याची सिस्टिम बसवली. तिला अनुसरून महाराष्ट्रातील रेड झोन जिल्ह्यांनी काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.
गोवा मॉडेलनुसार घरोघरी जाऊन तपासणी करा. उपचार करा. कन्टेन्मेंट झोनमध्ये ताबडतोब अंमलबजावणी करा. कोरोना लक्षणांच्या चाचणी बरोबरच पावसाळ्याशी संबंधित विकारांचीही आतापासून काळजी घ्या. तशा उपाययोजना करायला सुरवात करा, अशी सूचनाही उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनांना केली आहे.