The fourth Indian to go into space: Sirisha Bandal
पण खूप कमी लोक असतात जे आपल्या बालपणी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेड्यासारखे प्रयत्न करतात. ह्या अश्या वेडापायीच जगामध्ये मोठमोठे रेकॉर्ड्स बनले आहेत. तर आज आपण अश्या एका मुलीच्या आयुष्यावर प्रकाश टाकणार आहोत जिने लहानपणापासून आकाश, तारे यांना जवळून पाहण्याचा ध्यास धरला आणि नंतर तो पूर्णही केला.
सिरिशा बांदल ह्या एक भारतीय-अमेरिकन एरोनॉटीकल इंजिनिअर आणि अंतराळ पर्यटक आहेत. व्हर्जिन गॅलेक्टिक ही अमेरिकन कंपनी आहे. ही कंपनी स्पेस क्राफ्ट्स संबंधी तंत्रज्ञाना विकसित करण्यासाठी काम करते. ह्या कंपनीची सरकारी व्यवहार आणि संशोधन कार्यालयाच्या उपाध्यक्ष आहेत सिरिशा बांदल. ‘व्हर्जिन गॅलेक्टिक युनिटी २२’ हे ‘स्पेस शिप टू क्लास VSS’ या स्पेसशिपचे सबओरबीटल स्पेस फ्लाईट आहे. ह्या सबओरबीटल स्पेस फ्लाईट मधून प्रवास करण्याऱ्या, अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या त्या दुसऱ्या महिला आहेत. राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स नंतर अंतराळ जाणाऱ्या त्या चौथ्या भारतीय व्यक्ती ठरल्या आहेत.
सिरिशा बांदल यांचा जन्म :
सिरिशा यांचा जन्म आंध्रप्रदेश मधील गुंटूर जिल्ह्यातील. तेलगू भाषिक हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब गुंटूरमधील तेनाली येथे राहायला गेले. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत त्या कधी हैदराबादमधील त्यांच्या आजोबांच्या घरी तर कधी तेनाली येथील त्यांच्या आजीच्या घरी राहायच्या.
सिरिशा बांदल यांचे शिक्षण :
सिरिशा यांनी पर्ड्यू विद्यापीठातून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जॉर्जटाउन विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. सिरिशा यांना नासाच्या अंतराळवीर म्हणून काम करण्याची इच्छा होती. परंतु त्यांच्या वैद्यकीय कारणास्तव त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली.
सिरिशा बांदल यांची कारकीर्द :
पुढे त्यांनी कमर्शिअल स्पेस फ्लाइट फेडरेशनमध्ये मॅथ्यू इसाकोविट्झ यांच्यासोबत एरोस्पेस इंजिनिअर म्हणून काम केले. त्यांनी नंतर त्याच्या सन्मानार्थ मॅथ्यू इसाकोविट्झ फेलोशिपची सह-स्थापना केली.
सिरिशा बांदल यांचा अंतराळ प्रवास :
२०१५ मध्ये त्यांनी व्हर्जिन गॅलेक्टिक ही कंपनी जॉईन केली. जिथे त्या सध्याही सरकारी व्यवहारांची आणि संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून काम करतात. ११ जुलै २०२१ रोजी बांदला यांनी सर रिचर्ड ब्रॅन्सन, डेव मॅके, मायकेल मासुची, बेथ मोझेस, कॉलिन बेनेट या सहकाऱ्यांसह व्हर्जिन गॅलेक्टिक युनिटी २२ ह्या सब ओरबीटल फ्लाइट मधून अंतराळ प्रवास करण्याचा मान मिळवला. स्पेस शिप टू क्लास VSS या रॉकेत प्लेनने पृथ्वीपासून ८५ किमी इतके अंतर पार केले. ह्या स्पेसिशिप मधील चालक तसेच इतर अंतराळ प्रवाशी एफएए व्यावसायिक अंतराळवीर म्हणून पात्र ठरले.
याच प्रवासादरम्यान, सिरिशा बांदला यांनी फ्लोरिडा विद्यापीचा मार्फत एक प्रयोग केला. अंतराळात वनस्पतीवर गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव कसा असतो? तो किती प्रमाणात बदलतो? ह्या बदल प्रक्रियेचा अभ्यास त्यांनी ह्या अंतराळ प्रवास केला होता.
सिरिशा बांदल यांच्या आजोबांची प्रतिक्रिया :
सिरिशा बांदल यांचे आजोबा डॉ. बांदला रागैया यांनी आपल्या नातीचे कौतुक करताना म्हणाले: “अगदी लहानपणापासूनच तिला आकाश, चंद्र आणि तारे शोधण्याची महत्वाकांक्षा होती. सिरीशाने ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. त्यामुळे मला अभिमान वाटतो की ती तिचे स्वप्न साकार करण्यास सज्ज आहे.”
कल्पना चावला प्रोजेक्ट :
4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा आठवडा जागतिक अंतरिक्ष आठवडा म्हणून साजरा केला जातोय. संयुक्त राष्ट्रसंघ देखील हा आठवडा ‘वूमन इन स्पेस’ यांच्या सन्मानार्थ साजरा करत आहे. तर सिरिशा बांदल यांनी कल्पना चावला प्रोजेक्ट ह्याच आठवडयात जॉईन केला आहे. अंतरिक्ष स्टडी, इनोव्हेशन या क्षेत्रातील पुढील अभ्यास आणि संशोधना साठी त्यांना ह्या प्रोजेक्ट मध्ये सामील करून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष विद्यापीठा मार्फत हा प्रोजेक्ट भारताच्या पहिला अंतरळवीर कल्पना चावला यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आला होता.