एक सिनेमा म्हटल्यावर त्या सिनेमा मध्ये कोण हिरो आहे आणि कोण हिरोईन आहे असे म्हणण्याचे दिवस आता गेलेत. एखाद्या सिनेमामध्ये हीरो हीरोइन्ससोबत सहकलाकार कोण आहेत, सिनेमाचे दिग्दर्शक कोण आहेत, सिनेमाला म्युझिक कोणी दिले आहे अशा बऱ्याच गोष्टींचा विचार सध्या प्रेक्षक करताना दिसून येतात. सिनेमा म्हटलं की पुरुष दिग्दर्शक किंवा निर्माता असणे या गोष्टी देखील आता जुन्या झाल्या आहेत. जमाना बदल गया है. बऱ्याच स्त्री दिग्दर्शकांनी बॉलीवूडमध्ये अतिशय उत्तम सिनेमे दिले आहेत. चला तर पाहूया अशा काही स्त्री दिग्दर्शकांबद्दल….
Female Directors! Film making is not man’s domain, these female directors have proven it
१. झोया अख्तर : शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची मुलगी म्हणजे झोया अख्तर. झोया एक स्क्रीन रायटर आहे. सोबतच ती एक उत्कृष्ट दिग्दर्शिका देखील आहे. दिल धडकने दो, गली बॉय, लक बाय चान्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा असे सुपरडुपर हिट सिनेमे तिने दिले आहेत.
२. मीरा नायर : भारतीय वंशाच्या असणाऱ्या मीरा नायर यांनी ‘मीराबाई फिल्म्स’ नावाची प्रोडक्शन कंपनी चालू केली. आणि या कंपनीद्वारे त्यांनी सर्वोत्कृष्ट सिनेमे बनवले. मिसिसिपी मसाला, कामसूत्र अ टेल ऑफ लव्ह, द नेमसेक, मान्सून वेडींग, सलाम बॉम्बे, सुटेबल बॉय, अंडर हर नेम, प्राइड अँड प्रेज्युडीस अशा बऱ्याच मुव्ही त्यांनी बनवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव चित्रपटाच्या माध्यमातून मोठं करण्यामध्ये मीरा नायर यांचा खूप मोठा सहभाग आहे.
३. कोंकणा सेन : वेक अप सिड किंवा मेट्रो सिनेमातील कोंकणा एक अभिनेत्री म्हणून सर्वांनाच आवडली होती. एक अक्ट्रेस, रायटर असणारी कोंकणा दिग्दर्शकदेखील आहे. डेथ इन द गुंज हा तिने दिग्दर्शित केलेला सिनेमा प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही प्रचंड आवडला होता.
४. अपर्णा सेन : अपर्णा सेन यांना नऊ राष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्वात माेठा पद्मश्री हा अवॉर्ड देखील त्यांना मिळाला आहे. एकेकाळी यांनी अभिनेत्री म्हणून देखील काम केले होते. स्क्रीन रायटर डिरेक्टर असणाऱ्या अपर्णा सेन यांनी ३६ चौरंगी लेन, पारोमा, गोयणार बाकशो हे सुपरहिट बंगाली सिनेमे बनवले आहेत.
५. गौरी शिंदे : मराठमोळी दिग्दर्शिका गौरी शिंदे हिने इंग्लिश विंग्लिश आणि डिअर जिंदगी या सुपरहिट सिनेमांमधून आपल्या उत्कृष्ट दिग्दर्शन कौशल्याचा पुरावा दिला आहे.
६. अलंक्रीता श्रीवास्तव : लिपस्टिक अंडर माय बुरखा हा सिनेमा अलंक्रीता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केला होता. प्रामुख्याने स्त्रीवादी सिनेमा बनवण्यावर अलंक्रीता श्रीवास्तव यांचा भर असतो. त्यांनी आजवर डॉली किट्टी और वो चमकते सितारे, मेड इन हेवन, बॉम्बे बेगम या स्त्रीवादी सीरिज आणि मूव्हीज दिग्दर्शित केल्या आहेत.
७. मेघना गुलजार : तलवार सिनेमा फेम डिरेक्टर मेघना गुलजार यांनी राजी आणि छपाक या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध गीतकार गुलजार तिचे वडील आहेत.
८. नंदिता दास : एकेकाळी अभिनय क्षेत्रामध्ये काम करणारी नंदिता दिग्दर्शन क्षेत्राकडे वळली आहे. तिने फिराक आणि मंटो या उत्कृष्ट आणि क्लास सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.
९. अश्विनी अय्यर तिवारी : ऍडव्हर्टायजिंग क्षेत्रामध्ये आपल्या यशस्वी करिअर नंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केले. नील बट्टे सन्नाटा, बरेली की बर्फी आणि पंगा उत्कृष्ट सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
१०. तनुजा चंद्रा : एकेकाळी सहायक लेखिका म्हणून काम करणार्या तनुजा चंद्रा यांनी दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केले. संघर्ष, सूर द मेलडी ऑफ लाइफ, करीब करीब सिंगल या उत्कृष्ट सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांनी दिल तो पागल है या सिनेमासाठी सहाय्यक लेखिका म्हणून काम केले होते.