कोरोना रुग्णसेवेत कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची काळजी श्रीजना गुममला यांनी घेतली. बावीस दिवसांच्या गोंडस मुलाबरोबर चक्क कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी झटणाऱ्या श्रीजना गुममला यांची कर्तव्यनिष्ठा वाखाणण्यासारखी आहे.Dutifulness of Shrijana Gummala
हैदराबाद : ग्रेटर विशाखापट्टणम महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीजना गुममला यांची कर्तव्य निष्ठा वाखाणण्यासारखी आहे. स्वतः बाळांत झाल्यानंतर २२ दिवसांच्या बाळाला मांडीवर घेऊन त्या कार्यालयात हजर होत्या.
जेव्हा त्या २२ दिवसांचा मुलगा मांडीवर घेऊन कार्यालयात काम करत असल्याचे छायाचित्र नेटिझन्स आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेत होते. त्याचे एक छायाचित्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर श्रीजाना यांनी सहा महिन्यांची प्रसूती रजा रद्द केली आणि शहरात कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढली तेव्हा ग्रेटर विशाखापट्टणम महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून पुन्हा कर्तव्ये सुरू केले.
हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून मानसशास्त्र पदवीधर, सृजना २०१३ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यूपीएससी परीक्षेत त्या ४४ व्या क्रमांकावर होत्या. त्या एक वरिष्ठ IAS अधिकारी जी. बलरामय्या यांची मुलगी आहे. स्वीडनच्या उपसला विद्यापीठातून त्यांनी सुवर्णपदक पटकावले आणि सध्या त्या डॉक्टरेट करत आहेत.