• Download App
    डॉ. उज्ज्वला दहिफळे, अॅड कल्पलता पाटील- भारसवाडकर व वैशाली केनेकर यांना 'द फोकस इंडिया'चा पहिला दुर्गा सन्मान जाहीर..! प्रशांत दामले यांच्या हस्ते औरंगाबादेत रविवारी सन्मान सोहळाDr. Ujjwala Dahiphale, Ad Kalpalata Patil- Bharaswadkar and Vaishali Kenekar awarded first Durga honor of 'The Focus India'

    डॉ. उज्ज्वला दहिफळे, अ‍ॅड. कल्पलता पाटील- भारस्वाडकर व वैशाली केनेकर यांना ‘द फोकस इंडिया’चा पहिला दुर्गा सन्मान जाहीर..! प्रशांत दामले यांच्या हस्ते औरंगाबादेत रविवारी सन्मान सोहळा

     

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : समाजातल्या दुष्ट शक्तींविरुद्ध लढवून सुष्ट शक्तींना बळ देणारी दुर्गा… स्त्रीशक्तीचे हे रूप वेद – पुराणांनी कल्पिलेले आहे. या स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान, तिच्या लढ्याला केलेला मानाचा मुजरा म्हणून ‘द फोकस इंडिया’च्या वतीने पहिला दुर्गा सन्मान स्त्रीशक्तीला समर्पित करण्यात येत आहे..! Dr. Ujjwala Dahiphale, Ad Kalpalata Patil- Bharaswadkar and Vaishali Kenekar awarded first Durga honor of ‘The Focus India’

    द फोकस इंडियाच्यावतीने देणारा हा पहिला दुर्गा सन्मान पुरस्कार स्त्री सक्षमीकरणाचे उज्ज्वल कार्य करणाऱ्या प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे, ख्यातनाम वकील कल्पलता पाटील- भारसवाडकर आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंटच्या वरिष्ठ अधिकारी वैशाली केनेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. शहरातील अँबॅसिडर अजंठा हॉटेलमध्ये रविवार दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता होणाऱ्या समारंभात प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते वरील तीनही महनीय व्यक्तींना ‘द फोकस इंडिया’चा दुर्गा सन्मान प्रदान करण्यात येईल.

    ही फक्त पुष्प मंडित पूजा नाही, तर स्त्रीशक्तीला समाजातल्या अन्यायाविरूद्ध, सामाजिक कु रीती, कु प्रथांविरुद्ध लढण्याचे बळ आणि प्रोत्साहन देण्याचा हा एक प्रयत्न आहे. नुसत्या स्त्री-पुरुष समानतेचा तोंडी घोष करण्याचा हा प्रकार नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून समाजासाठी उदाहरणे घालून देणाऱ्या महनीय व्यक्तींचा हा सन्मान आहे. स्त्रीमधल्या सर्जनशील आत्मशक्तीचा हा जागर आहे.

    यांचा होतो आहे सन्मान…

    • डॉ. उज्ज्वला दहिफळे :

    सर्वांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य फुलावे यासाठी काम करणाऱ्या डॉ. उज्वला दहिफळे यांची शैक्षणिक आणि वैद्यकीय कारकीर्द त्यांच्या नावा इतकीच उज्वल राहिली आहे!!
    त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्लास्टिक सर्जरी या विषयाच्या असिस्टंट प्रोफेसर आहेत. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिस प्लास्टिक सर्जन याच्या संस्थेच्या त्या ऑर्गनायझेशन सेक्रेटरी आहेत. आधी उल्लेख केल्याप्रमाणे स्माईल इंडिया संस्थेच्या त्या प्रकल्प संचालिका आहेत. दोन हजार पेक्षा जास्त ओठ आणि टाळूच्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. केवळ भारतातच नाही तर जगामध्ये टाळू शस्त्रक्रियांचे त्यांचे काम मोठे आहे. अमेरिका, म्यानमार या देशांमध्ये त्यांनी टीम लीडर म्हणून काम केले आहे. इतकेच नाही तर देशात कोलकता, गुवाहाटी, जमशेदपूर, मुंबई आणि औरंगाबाद या केंद्रांमध्ये देखील त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.

    • अ‍ॅड. कल्पलता पाटील- भारस्वाडकर :

    भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार, महिला आणि मुलांचे अधिकार या विषयावर अथॉरिटी असलेल्या एडवोकेट कल्पलता पाटील भारस्वाडकर हे केवळ औरंगाबादचे नव्हे, तर महाराष्ट्रात कायदा क्षेत्रातले एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य पीठ आणि औरंगाबाद नागपूर खंडपीठाच्या खंडपीठात वकिली तर करतातच पण महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, मुंबई आणि औरंगाबाद तसेच सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, मुंबई याच्या गेले 29 वर्ष सदस्य आहेत.

    21 ऑगस्ट 1990 पासून ते आजतागायत मा. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी पाच हजार पेक्षा अधिक केसेस लढवल्या आहेत. यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क, प्राप्तिकर लवाद, या खटल्यांचा समावेश आहे. माननीय उच्च न्यायालयाने मध्यस्थ म्हणून सोपवलेल्या अनेक खटल्यांची यशस्वी कामगिरी त्यांच्या नावावर आहे.

    • वैशाली संजय केनेकर :

    वैशाली संजय केनेकर, औरंगाबादच्या कॅन्टोन्मेंट परिक्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव. महिला आणि मुलींचा मुलींच्या संरक्षण आणि सक्षमीकरणात कायमच आघाडीवर राहिलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्व. वैशालीताई गेली दहा वर्ष सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन काम करत आहेत. औरंगाबाद कॅंटोनमेंट हे राज्यातल्या सर्व कॅन्टोन्मेंटसाठी एक रोल मॉडेल बनावे, ही त्यांची विकासाची दृष्टी आहे. त्या साठी त्या कामही करत आहेत. महिला आणि मुलींच्या संरक्षणात क्षेत्रात त्यांनी आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचे आरोग्य, शिक्षण, त्यांच्याविरुद्ध होणारे लैंगिक अत्याचार यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वैशाली ताईंनी 2013 पासून अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. महिलांना यामध्ये सहभागी होण्यासाठी तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष कामकाजात योगदान वाढविण्यापर्यंत त्यांनी महिलांना प्रोत्साहन दिले आहे. पुण्याच्या साधना इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.

    Dr. Ujjwala Dahiphale, Ad Kalpalata Patil- Bharaswadkar and Vaishali Kenekar awarded first Durga honor of ‘The Focus India’

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??