• Download App
    खुशखबर! Zydus Cadila या कंपनीच्या Virafin हया औषध वापराला भारतात परवानगी ! Zydus Cadila gets DCGI nod for hepatitis drug for Covid-19 treatment

    खुशखबर! Zydus Cadila या कंपनीच्या Virafin हया औषध वापराला भारतात परवानगी

    • विराफीन दिल्यानंतर कोविड रुग्ण वेगाने बरे होण्यास मदत होत असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. रुग्ण लवकर बरे होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी होते. तसेच, रुग्णाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस देखील कमी होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली:देशात करोनाशी लढा सुरू आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात करोनासाठीचं लसीकरण देखील सुरू झालं. मात्र, अजूनही देशात रोज शेकडोंनी रुग्ण करोनामुळे मरत आहेत. आता Zydus Cadila या कंपनीचं Virafin हे औषध करोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी DCGI अर्थात Drugs Controller General of India नं मान्यता दिली आहे.Zydus Cadila gets DCGI nod for hepatitis drug for Covid-19 treatment

    ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने आपत्कालीन वापरासाठी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या ‘विराफीन’ (Virafin) या औषधाला कोरोनाच्या उपचारांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर रामबाण ठरणारं औषध Virafin ला Drugs Controller General of India ने मंजूरी दिली आहे. झायडल कॅडिला या कंपनीचं म्हणणं आहे की, हे औषध घेतल्यानंतर 7 दिवसांच्या आत रुग्णांची RT-PCR टेस्ट निगेटीव्ह आली असून 91.15 टक्के रुग्णांवर याचा परिणाम दिसून आला आहे.

    90 टक्क्यांहून अधिक परिणामकारक

    कंपनीचा असा दावा आहे की, Pegylated Interferon Alpha 2b (Verifin) हे औषध 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर परिणामकारक ठरलेलं आहे. क्लिनीकल ट्रायलमध्ये या औषधाचे 91.15 टक्क्यांपर्यंत रिझल्ट्स मिळाले आहेत. त्यामुळे रुग्णाला योग्यवेळी हे औषध दिल्यास कोरोनापासून त्याचा बचाव होण्याची शक्यता वाढली आहे. कंपनीने म्हटलंय की, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी भारतातील 20 ते 25 केंद्रांमधील 250 रुग्णांवर केली गेली होती. याचे विस्तृत निष्कर्ष लवकरच प्रकाशित केले जातील. गेल्या आठवड्यात कंपनीकडून जाहीर केलेल्या वक्तव्यात म्हटलंय की, कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर लगेचच हे औषध घेतल्यास रुग्णांना गतीने बरे होण्यास मदत होते.

    येत्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक असून औषध दिल्यानंतर ७व्या दिवशी करोनाबाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

    “जर रुग्णाला सुरुवातीच्या काळातच विराफीन दिलं, तर करोना विषाणूचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होतो. यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. अतिशय महत्त्वाच्या काळात हे औषध भारतात आलं असून आम्ही करोनाविरोधातल्या या लढ्यामध्ये त्याच्या मदतीने रुग्णांना साथ देऊ”, असं कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल म्हणाले आहेत.

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!