विशेष प्रतिनिधी
दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री भूषण यांनी गुरूवारी जाहीर केले की, झायडस कॅडीला ही कोरोना व्हॅक्सिनचा लवकरच राष्ट्रीय व्हॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये समाविष्ट करण्यात येईल. 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ही लस नागरिकांना उपलब्ध करून दिली जावी असा विचार केंद्र सरकार द्वारा केला जात आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Zydus cadila Covid-19 Vaccine will be part of national vaccination program : union health minister rajesh bhushan
अहमदाबादमधील झायडस कॅडिला या कंपनीद्वारे या लसीची निर्मिती केली गेली आहे. बऱ्याच दिवसांपासून या लसीला मान्यता मिळावी या संबंधी सर्व स्तरातून मागणी होत होती. ही लस आता अधिकृतपणे सर्वत्र उपलब्ध होणार आहे. वय वर्षे 12 ते 18 या वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार आहे. या लसीची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकार झायडस कंपनीसोबत चर्चा करत असल्याचे देखील आरोग्य मंत्री राजेश भूषण यांनी यावेळी सांगितले.
प्लासमिड डीएनए टेक्नॉलॉजीजद्वारे बनवली जाणारी ही व्हॅक्सीन तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. प्रत्येक डोसमध्ये 28 दिवसांत गॅप असणार आहे. असे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी यावेळी सांगितले आहे.
झायडस कॅडिला द्वारे बनवली गेलेली ही पहिलीच डीएनए लस असणार आहे. रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी SARS-CoV-2 चे स्पाइक प्रोटीन या लसीमुळे शरीरात तयार केले जाते. ही लस इंजेक्शन द्वारे दिली जाणार नसून इन्ट्राडर्मल इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. इंटर्न इंजेक्शन म्हणजे त्वचेच्या वरच्या भागामध्ये सुपरफिशिअल लस देणे. लवकरच या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये ही लस सर्वांना उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
Zydus cadila Covid-19 Vaccine will be part of national vaccination program : union health minister rajesh bhushan
महत्त्वाच्या बातम्या
- फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सार्कोझी निवडणुकीत ‘अवैध पैसा’ वापरल्याप्रकरणी दोषी, न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा
- Bhawanipur Bypoll : भाजप नेत्याच्या कारवर हल्ला, तृणमूलवर तोडफोडीचे आरोप, बनावट मतदारांवरून गोंधळ, EC ने मागवला अहवाल
- Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे, म्हणाले – ‘महामार्ग कायमचे रोखू शकत नाहीत!’, केंद्राला निर्देश
- Amarinder Singh : कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस सोडणार, पण भाजपमध्ये आताच प्रवेश नाही, काँग्रेस घसरणीला लागल्याची टीका
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात आमची लढाई , भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवा, शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मागणी