• Download App
    देशाबद्दल खोटी माहिती पसरवणारे युट्यूब चॅनेल्स आणि संकेतस्थळ होणार ब्लॉक-अनुराग ठाकूर । YouTube channels and websites spreading false information about the country will be blocked - Anurag Thakur

    देशाबद्दल खोटी माहिती पसरवणारे युट्यूब चॅनेल्स आणि संकेतस्थळ होणार ब्लॉक-अनुराग ठाकूर

    माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सरकार, देश यांच्याविरोधात कट रचणाऱ्यांवरील कारवाई सुरुच राहील असा इशारा दिला आहे. YouTube channels and websites spreading false information about the country will be blocked – Anurag Thakur


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुप्तचर संस्थेसोबत एकत्रित येत २० युट्यूब चॅनेल्स आणि २ संकेतस्थळांना ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. कारण त्यावरून भारताविरोधात चुकीची माहिती आणि बातम्या पसरवल्या जात होत्या.

    ही चुकीची माहिती पाकिस्तानमधून चालवली जात होती.त्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सरकार, देश यांच्याविरोधात कट रचणाऱ्यांवरील कारवाई सुरुच राहील असा इशारा दिला आहे.



    अनुराग ठाकूर यांनी म्हटलं की, भविष्यातसुद्धा भारताविरुद्ध खोटी माहित पसरवणारे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या खात्यांना ब्लॉक करण्यात येईल.तसेच या २० युट्यूब चॅनेल्स आणि २ संकेतस्थळांमधून भारताशी संबंधित वेगवेगळ्या संवेदनशील विषयांवर खोटा प्रचार केला जात होता. काश्मीर, भारतीय लष्कर, अल्पसंख्यांक, राम मंदिर, जनरल बिपिन रावत यांच्याशी संबंधित विषय़ांवर समाजात दुही पसरेल असा कंटेंट पोस्ट केला जात होता असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं होतं.

    पुढे ते म्हणाले की, मी त्यांच्या विरोधात कारवाईचा आदेश दिला होता. मला आनंद आहे की, जगभरातील इतर देशांनीसुद्धा याची माहिती घेतली. युट्यूबसुद्धा पुढे आलं असून त्यांनी ब्लॉक करण्याची कारवाई केली.

    YouTube channels and websites spreading false information about the country will be blocked – Anurag Thakur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी