• Download App
    ऑक्सिजन सिलिंडरअभावी युवकाचा झाडाखाली आश्रय , 10 दिवसांत कोरोना गायब ; ऑक्सिजन पातळीही वाढली |Youth Taken a Shelter under a tree due to lack of oxygen cylinder, corona disappears in 10 days; Oxygen level also increased

    ऑक्सिजन सिलिंडरअभावी युवकाचा झाडाखाली आश्रय , 10 दिवसांत कोरोना गायब ; ऑक्सिजन पातळीही वाढली

    वृत्तसंस्था

    पानिपत : ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने युवकाने शेतातील झाडाखाली आश्रय घेतला. दहा दिवसांत त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन तो कोरोनातून ठणठणीत बरा झाल्याची घटना पानिपतमध्ये घडली. Youth Taken a Shelter under a tree due to lack of oxygen cylinder, corona disappears in 10 days; Oxygen level also increased

    प्रदीप सिंह, असे युवकाचे नाव आहे. तो हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील नंगला गावाचा रहिवासी आहे. त्याला कोरोना झाला होता. त्याने घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, छातीत दुखू लागले,



    ऑक्सिजनची पातळी खालावल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.ऑक्सिजनची पातळी 80 पर्यंत घसरल्यावर प्रदीपच्या घरच्यांनीऑक्सिजन सिलिंडर किंवा ऑक्सिजन बेडसाठी धावाधाव केली, मात्र उपयोग झाला नाही.

    त्यामुळे प्रदीपने वैतागून शेतात एका झाडाखाली आश्रय घेतला. विशेष म्हणजे, तीनच दिवसांत त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. छातीतील वेदना कमी झाल्या.

    श्वास घेण्यातील अडचणीही दूर झाली. 10 दिवस तो दररोज 8 ते 10 तास झाडाखाली बसून होता. जेवणही तो तिथेच घ्यायचा. दहा दिवसांनी त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला.

    Youth Taken a Shelter under a tree due to lack of oxygen cylinder, corona disappears in 10 days; Oxygen level also increased

    महत्वाच्या बातम्या

     

     

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य