मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील काँग्रेस आमदाराच्या मुलाविरुद्ध युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचे या कार्यकर्तीने म्हटले आहे. Youth Congress activist accused of raping Congress MLA’s son
विशेष प्रतिनिधी
इंदूर : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील काँग्रेस आमदाराच्या मुलाविरुद्ध युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचे या कार्यकर्तीने म्हटले आहे.
इंदूर महिला पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडनगर भागातील काँग्रेसचे आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण मोरवाल याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय करणनं लग्नाचं आमिष दाखवत फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केल्याचा आरोप २८ वर्षीय महिलेनं केलाय. स्टेशन प्रभारी ज्योती शर्मा यांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.
काही वर्षांपूर्वी पीडितेची करणशी ओळख झाली होती. व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी तरुणीला लग्नाची मागणी घातल्यानंतर नशा देऊन आपल्या बालात्कार करण्यात आल्याचा दावा तरुणीनं केलाय. आमदाराच्या मुलानं आपल्याला धमकी दिल्याचा आणि याचा आॅडिओ रेकॉर्डिंग स्वरुपात आपल्याकडे पुरावा असल्याचा दावाही तरुणीनं केला आहे.
आमदार मुरली मोरवाल यांनी आपल्या मुलाविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगताना म्हणाले, आपल्या मुलाकडून धन लाटण्याच्या उद्देशानं संबंधित महिलेकडून खूप पूवीर्पासून प्रयत्न सुरू आहेत. ही महिला आपल्याविरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू शकते, असं लक्षात आल्यानंतर माझ्या मुलानं इंदूरच्या पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयात १ एप्रिल रोजी लिखित तक्रारही दाखल केली होती.
कॉँग्रेसने या प्रकरणाची दखल घेतलीय. कथित बलात्कार प्रकरणाची संघटना स्तरावर अंतर्गत चौकशीसाठी प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत भूरिया यांनी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. आठवड्याभरात समितीचा अहवाल येणार आहे. या समितीमध्ये दोन महिला आणि एका पुरुष नेत्याचा समावेश आहे.
Youth Congress activist accused of raping Congress MLA’s son
महत्त्वाच्या बातम्या
- भारत, चीन सोबत नासाने शेअर केला मंगळ मोहिमेचा डेटा, अंतराळातील संभाव्य अपघात टळणार
- एप्रिलच्या मध्यात महाराष्ट्रात होणारा कोरोनाचा विस्फोट, संशोधकांचे भाकीत, मेच्या अखेरपासून बाधितांचे प्रमाण घटणार
- काँग्रेसमुक्त भारत हवाय मग माकपमुक्त भारत का नको? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल
- धर्मनिरपेक्ष केरळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर झुकणार नाही, मुख्यमंत्री पी. विजयन यांचा घणाघात
- Corona In Maharashtra : महाराष्ट्राने गाठला कोरोना रुग्णांचा उच्चांक, एकाच दिवसात तब्बल ४९,४४७ नवीन रुग्णांची नोंद
- मालीत शस्त्रसज्ज जिहादींनी केलेल्या हल्ल्यात चार शांतीदूतांचा करूण मृत्यू