विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपूरम : ‘इसकी किंमत तुम्हे चुकानी पडेगी’ अशी धमकी हिंदी चित्रपटातील खलनायक पोलीसांना देतो. अगदी तसाच प्रकार कोचीमध्ये घडला असून लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अभिनेता दिलीप याने तपास करणाऱ्या पोलीसांना तुम्हाला याचा त्रास होणार आहे.You have to pay the price for my arrest, the accused actor in the sexual assault case threatens the police
मला धक्काबुक्की करणाऱ्यांचे हात कापून टाकले जातील, अशी धमकी दिली आहे.केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने मल्याळम अभिनेता दिलीपवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 2017 मध्ये एका अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करून अपहरण केल्याप्रकरणी दिलीपवर खटला चालू आहे.
- बलात्काराचा आरोप करत हनी ट्रॅप प्रकरणात बड्या उद्योगपतीची कोट्यवधीची फसवणूक, अभिनेत्याची पत्नी अटकेत
दिलीपचा भाऊ अनूप आणि त्याचा मेहुणा सूरज यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चित्रपट दिग्दर्शक बालचंद्रकुमार यांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबानुसार, दिलीप कोची शहराचे तत्कालिन पोलीस आयुक्त ए. व्ही. जॉर्ज यांच्याकडे पाहून म्हणाला माझी चौकशी केल्याचा तुम्हा पाच अधिकाऱ्यांना त्रास होणार आहे.
तुमच्यातील ज्यांनी मला मारहाण केली त्याचा हात कापला जाईल. दिलीपचा मेहुणा सुरज याने तर यापुढे जाऊन म्हटले की हे पोलीस रस्त्याने जात असताना कदाचित त्यांना एखादा ट्रक उडवू शकतो.
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, लैंगिक अत्याचार प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर 15 नोव्हेंबर 2017 रोजी दिलीपच्या एनार्कुलम येथील घरी पोलीस अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा कट रचला गेला. बालचंद्रकुमार यांनी या कटाचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे म्हटले आहे.
You have to pay the price for my arrest, the accused actor in the sexual assault case threatens the police
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांना धोक्यात टाकून जीवाशी खेळणाऱ्यांना शिक्षा काय तर दोनशे रुपये दंड, पंजाब पोलीसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
- कलम ३७० हटविले तसे देशातून निजाम आणि ओवेसींचे नावही नष्ट होईल, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे प्रतिपादन
- समान नागरी कायद्याबाबत न्यायालय कुठलेही निर्देश देऊ शकत नाही, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली भूमिका
- मुंबईप्रमाणे पुण्यातही मालमत्ता कर माफ करा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून आग्रही मागणी