विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे वागले. जे स्वतःच्या पित्याच्या अंत्येष्टीला आपल्या राजकर्तव्यपालनामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, ते योगीजी कल्याण सिंह यांच्या सारख्या माझ्या रामभक्त पित्याच्या अंत्येष्टीला उपस्थित राहिले, अशी कृतज्ञता कल्याण सिंह यांचे पुत्र राजवीर सिंह यांनी व्यक्त केली आहे. You acted like his eldest son’: Kalyan Singh’s son praises Yogi Adityanath
कल्याण सिंह यांच्या अंतिम विदाईची सर्व व्यवस्था योगीजींनी स्वतः आस्थेने केली. अगदी त्यांचे पार्थिव हॉस्पिटलमधून लखनौच्या घरापर्यंत आणण्याची व्यवस्था असो किंवा सरकारी इतमामात त्यांचे अंतिम संस्कार असोत, योगीजींनी स्वतः लक्ष घालून संपूर्ण व्यवस्था केली, असे राजवीर सिंह यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. राजवीर सिंह हे उत्तर प्रदेशातील एटा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत.
कल्याण सिंह यांच्या पार्थिवाचे दर्शन अलिगड, लखनौ या शहरातील जनतेला घेता यावे यासाठी योगीजींनी संपूर्ण सरकारी इतमामात व्यवस्था केली. ते आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ बंधूंसारखे आमच्या सर्वांच्या पाठीशी राहिले. आम्ही सर्व कुटुंबीय योगीजींचे आभारी आहोत, असेही खासदार राजवीर सिंह यांनी फेसबुक पोस्टमध्ये पुढे नमूद केले आहे.
योगींचे वडिल आनंद बिश्त यांचे गेल्या वर्षी कोरोना संक्रमणात निधन झाले होते. त्यावेळी देशात सर्वत्र लॉकडाऊन होते. उत्तर प्रदेशातही कोरोनाची लाट अधिक होती. सरकारी यंत्रणा संपूर्णपणे कार्यरत होती. त्यामुळे योगींना आपल्या वडिलांच्या अंत्येष्टीला उपस्थित राहाता आले नाही. योगींच्या थोरल्या बहिणीने वडिलांच्या अंत्येष्टीचे सर्व धार्मिक विधी केले होते. या पार्श्वभूमीवर खासदार राजवीर सिंह यांनी फेसबुक पोस्ट लिहून योगींचे आभार व्यक्त केले आहेत.
You acted like his eldest son’: Kalyan Singh’s son praises Yogi Adityanath
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : पालकांना विचारलेल्या प्रश्नांतूनच होते मुलांच्या मेंदूची खरी मशागत
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : जपानच्या टोयोटा ट्रान्सपोर्टची कार धावणार चक्क सौर ऊर्जेवर
- वैभव नाईक म्हणाले,कायदा काय असतो हे नारायण राणेंना कळून चुकले
- नारायण राणेंना जामीन मिळाला तरी त्यांना कायद्याच्या जंजाळात अडकविण्याचा प्रयत्न; २ सप्टेंबरला हजर राहण्याची नाशिक पोलीसांची नोटीस