वृत्तसंस्था
बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर सत्ताधारी भाजपने उमेदवार यादी जाहीर करण्यापूर्वीच केंद्रीय नेतृत्वाकडे जी स्टार कँपेनर्सची डिमांड केली आहे, त्यामध्ये सरप्राईज एलिमेंट भरपूर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे स्टार कँपेनर्स आहेतच. त्यांच्या बरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हेही आहेत. पण सरप्राईज एलिमेंट म्हणून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांना कर्नाटक भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांची प्रचंड डिमांड आहे. Yogi, Jaishankar, Hemant Vishwasharma top in demand for star campaigners from Karnataka BJP
मोदी, शाह, योगी, फडणवीस हे नेहमीचे स्टार कँपेनर्स आहेत. पण परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा हे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. ते त्यांच्या स्ट्रेट टॉक मुळे. यासाठीच त्यांनी कर्नाटकच्या शहरी भागामध्ये प्रचाराला यावे, असे भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे. जयशंकर हे फर्स्ट टाइम व्होटर्स विशेषतः कॉलेज गोइंग मतदारांना आपल्या बोलण्यातून खूप आकर्षित करतात, असा अनुभव आहे. परराष्ट्र धोरणातील गुंतागुंतीच्या बाबी देखील त्या सहजतेने समजावून सांगतात. त्यामुळे मध्यम आणि उच्चशिक्षित वर्गामध्ये जयशंकर खूप पॉप्युलर आहेत. शहरी भागातील मतदारसंघांमध्ये विशेषतः तरुण मतदारांवर त्यांचा खूप प्रभाव पडू शकतो, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण; पंतप्रधान मोदींचे मानले आभार
त्याचबरोबर हेमंत विश्वशर्मा आसाम मधल्या त्यांच्या कामगिरीमुळे कर्नाटकात पॉप्युलर होतील, असा भाजपच्या नेत्यांचा होरा आहे. विश्वशर्मा यांनी आसाम मध्ये मदरसे बंद करून दाखवले. कर्नाटकात हिजाबचा विषय तापला असताना त्यांनी आसामात कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणून हेमंत विश्वशर्मा कर्नाटकात लोकप्रिय ठरू शकतील, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. कर्नाटकातील ग्रामीण आणि शहरी भागात हेमंत विश्वशर्मा यांच्या सभा भाजप आयोजित करणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रामुख्याने मराठी भाषा प्रभाव असलेल्या कर्नाटकच्या किनारपट्टी भागामध्ये प्रचार करतील. स्मृती इराणी यांना शहरी आणि ग्रामीण भागातील महिला मतदारांच्या मेळाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलवले जाईल. या संदर्भातले अंतिम नियोजन येत्या दोन-तीन दिवसात अपेक्षित आहे.
पण परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची तरुणांमधली वाढती लोकप्रियता हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील प्रचारातले सरप्राईज एलिमेंट आहे. जयशंकर हे कधीच राजकीय नेते नव्हते. ते नोकरशहा होते. त्यांनी कोणत्याही निवडणुकीत कधीही प्रचार केलेला नाही. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. पण सुषमा स्वराज यांच्यानंतरचे ते कार्यक्षम आणि लोकप्रिय परराष्ट्रमंत्री बनले आहेत. विद्यार्थ्यांशी सुसंवाद हा त्यांचा यूएसपी आहे आणि त्यांचे कॅम्पेन सोशल मीडियात प्रचंड चालते असा अनुभव आहे. म्हणूनच जयशंकर यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात फार मोठी डिमांड आहे.
Yogi, Jaishankar, Hemant Vishwasharma top in demand for star campaigners from Karnataka BJP
महत्वाच्या बातम्या