वृत्तसंस्था
औरिया : भारत देश शरियत कायद्यानुसार नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानानुसारच चालेल, असे प्रत्युत्तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिजाब वादावर दिले आहे.Yogi Adityanath’s response to hijab controversy
या देशात “गजवा ए हिन्द”चे दिवास्वप्न पाहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे, की देशात हिंदू जिवंत आहेत. ते एकवटलेले आहेत. त्यामुळे देश इस्लामी शरियत कायद्यानुसार नव्हे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार चालेल, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला. औरियामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.
उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर काँग्रेस समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे चेहरे कोमेजले आहेत. कारण त्यांना राज्यातल्या राजकीय हवेचा अंदाज आला आहे. हिजाब सारखा वाद उकरून काढून आपला काही फायदा होणार नाही हे देखील त्यांच्या लक्षात आले आहे, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला.
उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कोणीही निर्माण करू नये आपल्या खासगी व्यवहारात कोणता पोशाख घालावा यावर कोणतेही बंधन संविधानाने घातले नाही. मात्र, शिक्षण संस्था आणि अन्य काही संस्थांमध्ये गणवेश अनिवार्य असतो. संविधानाच्या तरतुदीतील कायद्यानुसारच शिक्षण संस्था आणि अन्य काही संस्थांना गणवेश ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे, या मुद्याकडेही योगी आदित्यनाथ यांनी लक्ष वेधले आहे.
Yogi Adityanath’s response to hijab controversy
महत्त्वाच्या बातम्या
- #CaptainModi4Punjab : सुपर संडे प्रचारात पंजाब मध्ये जोरदार ट्रेंड!!
- सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : सरकारने धरली माघारीची वाट; अण्णांनीही सोडला उपोषणाचा आग्रह!!
- शिवजयंती मिरवणुकीस परवानगी देण्याची मागणी
- आदित्य ठाकरेंना देशव्यापी नेतृत्व करायला पाठवून महाराष्ट्रात कोणाचा मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे??