• Download App
    उत्तर प्रदेशात 4.5 वर्षांत दिले 4.5 लाख रोजगार, योगी आदित्यनाथ म्हणाले यावर कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही|Yogi Adityanath said that no one can question the 4.5 lakh jobs given in 4.5 years in Uttar Pradesh

    उत्तर प्रदेशात ४.५ वर्षांत दिले ४.५ लाख रोजगार, योगी आदित्यनाथ म्हणाले यावर कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही

    विशेष प्रतिनिधी

    चांदौली : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची सत्ता असताना रोजगारनिर्मिती व्हायची नाही. मात्र, भाजपाच्या नेतृत्वात येथे सत्ता आल्यानंतर मागील साडेचार वर्षांत 4.5 लाख रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आणि त्यावर कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही, अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.Yogi Adityanath said that no one can question the 4.5 lakh jobs given in 4.5 years in Uttar Pradesh

    योगी आदित्यनाथ म्हणाले, यापूर्वी राज्यात केवळ 12 वैद्यकीय महाविद्यालये होती. आम्ही आता 33 वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करीत आहोत. शेतकऱ्यांनी काळ्या तांदळाचे विक्रमी उत्पादन घेऊन मोठी कामगिरी केली आहे.



    मागील तीन वर्षांत प्रचंड परिश्रम घेत येथील 2,400 शेतकºयांनी 2,100 हेक्टर जमिनीवर काळ्या तांदळाचे पीक घेतले. हे शेतकरी चांदौलीला निर्यात केंद्र म्हणून विकसित करीत आहेत.चांदौलीच्या सौंदर्यीकरणाची घोषणा करताना योगी आदित्यनाथ म्हणाले,

    भारताच्या संस्कृती आणि आध्यात्मिक प्रवासामुळे भारताला मानवतावादी क्षेत्रात नेतृत्व करण्यास मदत झाली आहे. चांदौलीतील बाबा कीनाराामच्या सौंदर्यीकरणाची आम्ही सुरुवात केली आहे.

    Yogi Adityanath said that no one can question the 4.5 lakh jobs given in 4.5 years in Uttar Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती