विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक राजकीय नेत्यांना हा विषाणू गाठू लागला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पाठोपाठ कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हेदेखील कोरोनाबाधित झाले आहेत.Yediyurappa, digvijaysingh, surjewala infected due to corona
त्याचप्रमाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनाही संसर्ग झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील दोन दिवसांपूर्वी बाधित ठरले आहेत.कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना आठ महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
एका खासगी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत. ‘माझी कोरोना चाचणी झाली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे,’ असे त्यांनी नंतर ट्विट केले.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेत विलगीकरणात जावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याआधीही गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये येडीयुरप्पा यांना संसर्ग झाला होता.
Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला