• Download App
    येडियुरप्पांची एकीकडे राजीनाम्याची भाषा, दुसरीकडे समर्थक – विरोधकांचीही जमवा जमव; खुंटा हलवून बळकटीचा प्रयत्न|Yeddyurappa language of resignation on the one hand, supporters and opponents on the other; Attempt to strengthen by moving the peg

    येडियुरप्पांची एकीकडे राजीनाम्याची भाषा, दुसरीकडे समर्थक – विरोधकांचीही जमवा जमव; खुंटा हलवून बळकटीचा प्रयत्न

    वृत्तसंस्था

    बेंगळुरू : कर्नाटक भाजपमध्ये राजकीय अस्वस्थतेची चाहूल लागताच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज सकाळी राजीनामा देण्याची भाषा केली खरी, पण त्याचवेळी त्यांनी समर्थक आणि आपल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही काही वक्तव्ये करायला लावल्याचे स्पष्ट दिसते आहे.Yeddyurappa language of resignation on the one hand, supporters and opponents on the other; Attempt to strengthen by moving the peg

    कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी तर मंगळवारी दिल्लीतच कर्नाटकात नेतृत्वबदलाची शक्यता फेटाळली होती. तर आज दुपारी महसूलमंत्री आर. अशोक यांनीही नेतृत्वबदलाची शक्यता फेटाळून आपण येडियुरप्पांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे सूचित केले. ते म्हणाले, की नेतृत्वबदलाच्या अफवांना पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. येडियुरप्पा हे आमचे नेते आहेत आणि तेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत.



    भाजपमधून असे दोन मंत्र्यांचे आवाज येत असतानाच आश्चर्यं म्हणजे काँग्रेसचे संकटमोचक नेते आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही येडियुरप्पांच्या नेतृत्वाची स्तुती केली आहे. ते म्हणाले, की येडियुरप्पांच्या राजीनाम्याच्या ऑफरमागे वेगळी राजकीय खेळी आहे.

    ते भाजपमधले आणि कर्नाटकाच्या राजकारणातले मजबूत नेते आहेत. भाजपने त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. त्यांनी आमचे राजकीय मित्र भाजपमध्ये खेचून नेले आणि राज्यात सत्ता आणून दाखविली आहे.

    भाजपच्या काही आमदारांचा येडियुरप्पांना विरोध असला, तरी दोन वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांची पाठराखण करणे आणि ऐन मोक्याच्या क्षणी डी. के. शिवकुमार यांच्या सारख्या खमक्या नेत्याने येडियुरप्पांची स्तुती करणे, हे काही वेगळेच राजकीय संकेत देऊन जात असल्याची चिन्हे आहेत.

    येडियुरप्पांनी एकीकडे राजीनाम्याची भाषा वापरणे आणि दुसरीकडे अशी समर्थक – विरोधकांची जमवा जमव करणे यातून भाजप श्रेष्ठींची काय प्रतिक्रिया येतेय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

    Yeddyurappa language of resignation on the one hand, supporters and opponents on the other; Attempt to strengthen by moving the peg

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!