• Download App
    YAAS Cyclone : पुढच्या 12 तासांत भीषण होणार यास चक्रीवादळ, उत्तर-पश्चिम दिशेने वाटचाल करणार असल्याची IMDची माहिती । YAAS Cyclone Updates, Yaas Cyclone To Intensify into Very Severe Cyclonic Storm in Next 12 Hours Says IMD

    YAAS Cyclone : पुढच्या 12 तासांत भीषण होणार यास चक्रीवादळ, उत्तर-पश्चिम दिशेने वाटचाल करणार असल्याची IMDची माहिती

    YAAS Cyclone Updates : भारतीय हवामान खात्याने (IMD) मंगळवारी अंदाज व्यक्त केला आहे की, चक्रिवादळ ‘यास’ येत्या 12 तासांत ‘अत्यंत भीषण चक्रीवादळात’ बदलेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर हे चक्रीवादळ मागच्या सहा तासांत 9 किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेने सरकले होते, ते 24 मे रोजी यूटीसीवर केंद्रित होते. YAAS Cyclone Updates, Yaas Cyclone To Intensify into Very Severe Cyclonic Storm in Next 12 Hours Says IMD


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने (IMD) मंगळवारी अंदाज व्यक्त केला आहे की, चक्रिवादळ ‘यास’ येत्या 12 तासांत ‘अत्यंत भीषण चक्रीवादळात’ बदलेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर हे चक्रीवादळ मागच्या सहा तासांत 9 किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेने सरकले होते, ते 24 मे रोजी यूटीसीवर केंद्रित होते.

    हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने वाटचाल करत राहील आणि आणखी बरेच वेगवान होईल. 26 मे रोजी सकाळी ते ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याजवळ पोहोचेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 26 मे रोजी दुपारी बालासोरजवळील पारादीप आणि सागर बेट ओलांडून ‘अत्यंत भीषण वादळात रूपांतरित होईल. सिस्टम सेंटरवर याची गती ताशी सुमारे 55 ते 65 किलोमीटर आहे. यादरम्यान, समुद्रातील स्थितीही धोकादायक पातळीवर जाऊ शकते.

    ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी तयार असल्याचे म्हटले

    ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सोमवारी केंद्र सरकारला माहिती दिली की, बालासोरजवळ 26 मे रोजी धडकणाऱ्या ‘यास’ या वादळाचा सामना करण्यासाठी राज्य सज्ज आहे. चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चेदरम्यान पटनायक यांनी हे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितले की, “आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि आमचे अधिकारी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. आम्ही आपल्याला आवश्यक गोष्टींबद्दल माहिती देऊ.”

    अमित शहा काय म्हणाले…

    केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “मी सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी, विविध रुग्णालयांमध्ये वीज बॅकअपची व्यवस्था आणि राज्यातील ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पांमध्ये सुरक्षिततेच्या सूचना दिल्या आहेत.” दरम्यान, ओडिशा सरकारने सखल भाग आणि बालासोर, भद्रक, केंद्रपारा आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांमधून तब्बल एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका जास्त आहे.

    YAAS Cyclone Updates, Yaas Cyclone To Intensify into Very Severe Cyclonic Storm in Next 12 Hours Says IMD

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य